महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bollywood Sex Racket: बॉलीवूडमधील सेक्स रॉकेटचा पर्दाफाश, कास्टिंग डायरेक्टर आरती मित्तलला आज न्यायालयात करण्यात येणार हजर - Bollywood Prostitution racket busted

दिंडोशी पोलिसांनी वेश्याव्यवसाय रॅकेट चालवून ग्राहकांना मॉडेल पुरवल्याच्या आरोपाखाली २७ वर्षीय महिला कास्टिंग डायरेक्टरला अटक केली. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने दोन डमी ग्राहक पाठवले आणि दोन मॉडेलची सुटका केली, ज्यांना आता पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले आहे. संपूर्ण तपास समाजसेवा शाखेने केला आहे. पुरावा म्हणून घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आहे.

female casting director arrested
महिला कास्टिंग डायरेक्टर

By

Published : Apr 18, 2023, 7:46 AM IST

Updated : Apr 18, 2023, 8:10 AM IST

मुंबई :या बॉलीवूड सेक्स रॉकेटमध्येआरती हरिश्चंद्र मित्तल ही आरोपी आहे. आरती चित्रपटांची कास्टिंग डायरेक्टर आहे. ती ओशिवरा येथील आराधना अपार्टमेंट्सची रहिवासी आहे. दिंडोशी पोलिसांनी सांगितले की, आरोपीने मॉडेल्सना वेश्याव्यवसायात ओढण्यासाठी त्यांना चांगल्या पैशांची ऑफर दिली होती. विविध प्रोजेक्ट्स दरम्यान भेटल्यावर त्यांना लक्ष्य केले. मित्तल हिने अभिनेत्री आणि कास्टिंग डायरेक्टर म्हणूनही काम केले. आरोपी आरतीला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या वेश्या व्यवसायाचे कनेक्शन कुठे कुठे पोचलेले आहे, याची पायामुळे शोधून काढण्याचे काम पूर्ण करणार आहे.


वेश्याव्यवसायाचे रॅकेट :पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक मनोज सुतार यांना आरती मित्तल ही वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालवत असल्याची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक सुतार यांनी एक टीम तयार केली. ग्राहक म्हणून मित्तलला बोलावून दोन मुली मागितल्या. त्याची व्यवस्था करण्यासाठी मित्तल यांनी ६० हजार रुपयांची मागणी केली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मित्तलने पोलीस निरीक्षक सुतार यांच्या फोनवर दोन महिलांचे फोटो पाठवले. त्यांना सांगितले की, या मॉडेल्स जुहू किंवा गोरेगावच्या हॉटेलमध्ये येतील.

छापा टाकून रंगेहाथ पकडले :सुतार यांनी गोरेगाव येथे दोन खोल्या बुक करून दोन डमी ग्राहक पाठवले. मित्तल दोन तरुणींना घेऊन तेथे पोहोचली. त्यांना कंडोमही दिले. हे सर्व गुप्त कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्ड करण्यात आले आहे. समाजसेवा शाखेने हॉटेलवर छापा टाकून आरोपीला रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात माहिती दिली. मित्तल हिच्याविरोधात एफआयआर नोंदवला. तपासादरम्यान, मॉडेल्सनी पोलिसांना सांगितले की, मित्तलने त्या मॉडेल्सना प्रत्येकी 15 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.



चित्रपट सृष्टीत वेश्याव्यवसायाचे रॅकेट :दिंडोशी पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, चित्रपट सृष्टीत वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालवल्याबद्दल आणि ग्राहकांकडून पैसे मिळवण्यासाठी मॉडेल पुरवल्याबद्दल आम्ही कथित आरोपीला अटक केली आहे. आम्ही आरती मित्तल हिच्याविरुद्ध भारतीय दंड संविधान कलम 370 आणि मुलींच्या तस्करीच्या इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपासासाठी हे प्रकरण गुन्हे शाखा कक्ष 11 गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.

हेही वाचा : Sex Racket jalna : घरगुती सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; कॉल गर्ल, सेक्स रॅकेट चालवणारे पती- पत्नी पोलिसांच्या ताब्यात

Last Updated : Apr 18, 2023, 8:10 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details