महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बंगालमधील हिंसाचाराविरोधात कांदिवलीत भाजपचे धरणे आंदोलन

तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर हिंसाचार सुरू केला असून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत आहेत, असा आरोप भाजपने केला आहे. त्याविरोधात बुधवारी ठिकठिकाणी निदर्शने झाली.

bjp dharna agitation in kandivali
कांदिवली भाजप आंदोलन

By

Published : May 6, 2021, 2:02 PM IST

मुंबई - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर हिंसाचार सुरू केला असून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत आहेत, असा आरोप भाजपने केला आहे. बुधवारी या विरोधात राज्यभर निदर्शने करण्यात आली. बंगालमधील राजकीय हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी मुंबई भाजप प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.

बंगालमधील हिंसाचार न थांबल्यास बंगालमध्ये जाण्याचा इशारा अतुल भातखळकर यांनी दिला

अन्यथा बंगालमध्ये जाऊ -

'पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुडाचे राजकारण सुरू झाले आहे. ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे लोक हल्ले करत आहेत. भाजप कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे, असे प्रकार घडत आहेत. महिलांवर अत्याचार होत आहेत. ही लोकशाहीची हत्या असून हे सहन करण्यापलीकडचे आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार अतुल भातखळकर यांनी दिली. बंगालमधील हिंसाचार न थांबल्यास संपूर्ण देशातील भाजप कार्यकर्ते पश्चिम बंगालमध्ये जाऊन मोठे आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details