महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मंत्री धनंजय मुंडे यांनी त्वरित राजीनामा द्यावा; भाजप नेते आक्रमक

धनंजय मुंडे यांनी त्वरित राजीनामा द्यावा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तपास सीबीआयकडे अथवा निवृत्त न्यायाधीशांच्या समितीकडे सोपवावा, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.

धनंजय मुंडे
धनंजय मुंडे

By

Published : Jan 13, 2021, 5:08 PM IST

Updated : Jan 13, 2021, 8:29 PM IST

मुंबई- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी त्वरित राजीनामा द्यावा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तपास सीबीआयकडे अथवा निवृत्त न्यायाधीशांच्या समितीकडे सोपवावा, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही ट्विट करून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

निवडणूक आयोगाला दिलेले पत्र

शर्मा भगिनींना संरक्षण द्यावे, दोन पेक्षा जास्त अपत्य असल्याने आणि त्याचा उल्लेख निवडणूक प्रतिज्ञापत्रात न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द व्हावे, तसेच द्विभार्या प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केले असल्यास कार्यवाही व्हावी अन्यथा भाजप राज्यभर निषेध आंदोलने करणार आहे, असे सोमैय्या म्हणाले.

सखोल चौकशी करावी - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. नैतिकतेच्या आधारावर त्यांच्या पक्षाने त्या कबुलीच्या संदर्भात विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यातील जी कायदेशीर बाब धनंजय मुंडे व तक्रारदार तरुणी दोघांनी मांडली आहे. धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी न्यायालयात गेल्याचे सांगितले आहे. त्यामुळे तत्काळ पोलिसांनी याबाबत सत्य बाहेर आणण्यासाठी सखोल चौकशी करावी त्यानंतर आम्ही आमची मागणी करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

गेंड्याच्या कातडीचे सरकार

सामाजिक न्यायमंत्री असलेल्या धनंजय मुंडे यानी आपल्या चुकीच्या कृत्यांबद्दल तत्काळ राजीनामा द्यायला हवा. मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही. भाजप महिला शाखेच्या वतीने एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, त्यामध्ये मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आम्हीही आता याविषयी आणखी जोरदार मागणी करणार आहोत. ज्या व्यक्तीवर अशा प्रकारचे आरोप होतात, त्याला या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नसतो. मात्र, गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार याबाबत आत्मपरीक्षण करून मुंडेंचा राजीनामा घेतील, असे वाटत नाही. तरीही मुंडे यांनी या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे,” असे चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील यांचे ट्विट
Last Updated : Jan 13, 2021, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details