जळगाव -एकनाथ शिंदे मुख्यमंत्री ( Chief Minister Eknath Shinde ) कसे झाले याचा विचार केला तर विश्वास बसणार नाही असे, ग्रामसमंत्री गिरिश महाजन ( Village Minister Girish Mahajan ) यांनी म्हटले आहे. ऑपरेशन सुरू झाले तेव्हा शिंदे पुढे सरसावले. तसेतसे सगळे सैन्य त्याच्या मागे गेले. शेवटी त्यांनी ही मोहीम फत्ते केली. म्हणावे तेव्हढे सोपी काम नव्हते मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न घडणारी गोष्ट करुन दाखवली.
शिवसेनेवर आमदार नाराज - शिवसेना ( Shiv Sena ) सारख्या पक्षाला फोडणे सोप नव्हत. शिवसेनेत सर्व आमदार, खासदार कार्यकर्ते नाराज होते म्हणुनच शिंदे सतरा अठरा जणांसह बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी जादूची कांडी फिरवत आमदारांची संख्या पन्नासवर नेली असे वक्तव्य गिरिश महाजन यांनी केले आहे. ते आज जळगाव येथे अखिल भारतीय बडगुजर समाजाच्या महा अधिवेशनात बोलत होते. पाचोरा तालुक्यातील लोहारी येथे झालेल्या बडगुजर समाजाच्या महाअधिवेशनात गिरीश महाजन यांनी शिवसेना फटीवर भाष्य केले आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यात भाजपचा हात होता की, काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाजन यांच्या वक्तव्यामुळे शिवसेना कार्यत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले होते. सरकारचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार आपला पुढील अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असं वाटत असतानाच एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी धोक्यात ( The government is in trouble due to the rebellion of Eknath Shinde ) होते.
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आणण्यासाठी शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका बजावली होती. कोणाच्या विचारातही नसताना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेचे सरकार त्यांनी महाराष्ट्र स्थापन ( three-party government in Maharashtra ) केले होते. हे सरकार देशापुढे मॉडल ठेवत भारतीय जनता पक्षाला पर्याय उभा केला जाऊ शकतो असा संदेश त्यांनी संपूर्ण देशभरात दिला होता. एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठं वादळ निर्माण झाले होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 41 अपक्षांसह एकूण 47 आमदार गुवाहाटीला नेले होते. राज्यातील या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली होती. एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला त्यावेळी केला होता. आज परत गिरिश महाजन यांनी असे विधान केल्यामुळे शिवसेनेच्या बंडामागे भाजपचा होता की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.