लोकप्रिय काळा घोडा महोत्सवाला सुरूवात मुंबई :मुंबईतील ऐतिहासिक काळा घोडा महोत्सवाला सुरूवात झाली आहे. काळा घोडा महोत्सव देशातील सर्वात मोठा सांस्कृतिक महोत्सव म्हणुन ओळखला जातो. या महोत्सवात हस्तकला, सिनेमा, नाटक, नृत्य, साहित्य आणि संगीत कला असे विविध राज्यातील स्टॉल नागरिकांसाठी उपलब्ध असतात. काळा घोडा महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे कलाकार आणि नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याचे व्यासपीठ उपलब्ध होते. यावर्षी हा महोत्सव 04 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून या महोत्सवात यंदा खाद्यपदार्थासह विविध वस्तू, पुस्तके, कपडे आणि शोभेच्या वस्तूंचे सुमारे ८० स्टॉल लावण्यात आले आहेत.
विविध कलाकृती : काळा घोडा महोत्सवामध्ये कलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी मोठी संधी देण्यात येते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे या ठिकाणी कलावंतांनी सादर केलेल्या कलाकृती आहेत या ठिकाणी कलावंतांनी संगणकाच्या कीबोर्ड चा वापर करून बनवलेली कार असेल केवळ तारांचा वापर करून बनवलेली रिक्षा असेल संगणकामधील चीपचा वापर करून बनवलेली मोटरसायकल असेल असे अनेक कलाकृतीमधून कलावंतांनी आपली कला सादर केली आहे.
बुटांचा संवंध ? :ठिकाणी कनिका या कलावंताने काथ्यांपासून बनवलेला मोठा बूट आणि त्यासाठी वापरण्यात आलेल्या चिंद्या आणि इतर बाबी काय दर्शवतात हे सांगितले आहे. आपल्या पायातील भूत हे नेहमीच आपल्याला पुढे जायला भाग पाडत असतात. त्याचप्रमाणे ते मागेही जातात म्हणजेच भूतकाळ आणि भविष्याचा बुटाशी संबंध आहे. याच बुटाचा मातीशी ही तितकाच संबंध आहे म्हणजे आपण नेहमी जमिनीवर असायला पाहिजे आणि जमिनीची पर्यावरणाशी आपलं नातं कायम टिकवायला पाहिजे हे बूट दाखवतात असं कनिका सांगतात त्यांनी अतिशय कल्पकतेने आणि सर्जनशीलतेने बनवलेली ही कलाकृती तिथल्या कलाप्रेमीना खूप आवडत असून सर्वजण या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी गर्दी करू लागल्याचे दिसते आहे.
कलाप्रेमींची कला महोत्सवात गर्दी :दरवर्षीप्रमाणे याही वर्षी काळा घोडा कला महोत्सवाला शेकडो पर्यटकांनी पहिल्याच दिवशी भेट दिली आहे विविध कलाकृतींचा आस्वाद घेताना आणि त्यांच्यासोबत फोटो काढताना कलाप्रेमी हरवून जात आहेत विशेषता या कला महोत्सवात अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचाच समावेश आहे मात्र त्यातही तरुण आणि तरुणींचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या महोत्सवाला लाभतो आहे 12 फेब्रुवारी पर्यंत असलेल्या या महोत्सवाला उद्यापासून आणखी गर्दी होण्याची शक्यता आयोजकांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा -Nana Patole On Ajit Pawar : सत्यजित तांबे प्रकरण अजित पवारांनी चव्हाट्यावर आणले; नाना पटोले यांचा आरोप