महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इटीव्ही विशेष - बॅनरबाजीला कोरोनाचा दणका!

कोरोनामुळे अनेक व्यवसायांवर परिणाम झाला. बॅनर व्यवसायावरही कोरोनाचा परिणाम झाल्याचे चित्र आहे. हा व्यवसाय करणाऱ्यांना आता आपल्या दैनंदिन गरजा भागवणेदेखील कठीण झाले आहे.

By

Published : Nov 25, 2020, 8:32 AM IST

corona effect on banner business
बॅनर व्यावसायिकांना लॉकडाऊनचा फटका

मुंबई - संपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत आहे. कोरोनामुळे अनेक व्यवसायांवर परिणाम झाला. बॅनर व्यवसायावरही कोरोनाचा परिणाम झाल्याचे चित्र आहे. हा व्यवसाय करणाऱ्यांना आता आपल्या दैनंदिन गरजा भागवणेदेखील कठीण झाले आहे.

बॅनर व्यावसायिकांना लॉकडाऊनचा फटका

लॉकडाऊननंतरही व्यवसायात अडचणी

शहरातील असो किंवा गावातील सर्वच बॅनर व्यावसायिकांना लॉकडाऊनचा फटका बसला आहे. लॉकडाऊनमध्ये जरी शिथिलता असली आली तरी अजूनही आर्थिक उलाढाल तसेच राजकीय कार्यक्रम सुरू झाले नसल्याने बॅनर व्यवसाय अडचणीत आले आहेत. त्यात अपुरे शिक्षण, इतर आर्थिक उत्पन्न नसल्याने प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. फ्लेक्स बॅनर प्रिंटिंगच्या मशीन महाग असल्याने त्यांचा मेंटेनन्स करण्याचा खर्च आणि इतर खर्चामुळे आर्थिक भार वाढला आहे. इतर वेळी महिन्याला तीस ते चाळीस हजार रुपयांची कमाई होते. मात्र, आता काहीच कमाई नाही, असे व्यावसायिकांनी सांगितले. परिस्थिती पूर्ववत झाली तरी आमच्याकडे पहिल्यासारखी मागणी पूर्ववत व्हायला वेळ लागणार आहे. त्यामुळे बॅनर व्ययसायिकांमध्ये उदासीनता आहे.

हेही वाचा -काँग्रेस नेते अहमद पटेलांचे निधन; नेत्यांनी व्यक्त केला शोक..

हेही वाचा -'ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड'चे उपाध्यक्ष मौलाना कल्बे सादिक यांचे निधन

ABOUT THE AUTHOR

...view details