मुंबई- मी माझा राजीनामा सादर केला आहे. त्यानंतर जे काही निर्णय घ्यायचे आहे, ते काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर अवलंबून राहिल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचा राजीनामा; लवकरच राहुल गांधींची घेणार भेट
मी माझा राजीनामा सादर केला असून लवकरच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, की मी राजीनामा सादर केला असूने त्यात आता जे काही फेरबदल करायचे आहे ते राहुल गांधी यांच्यावर अवलंबून राहणार आहे. तसेच पक्षाच्या महाराष्ट्रातील कामगिरीबद्धल चर्चा करण्यासाठी लवकरच राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत देशभरात झालेला पराभवाला राहुल गांधी सर्वस्वी जबाबदार नाहीत. पक्षाचे नेतृत्व करणारे प्रत्येकजण त्यास जबाबदार आहेत. महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे मी कोणावर दोष देत नाही, असे चव्हाण यांनी म्हटले.