मुंबई : शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघांत जांभोरी मैदानात भाजपकडून दहीहंडी, नवरात्रोत्सव व आता दीपावली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावरून भाजपने हे मैदान आपल्या फायद्यासाठी हायजॅक केल्याची टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून होत आहे. या मुद्द्यावरून मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना प्रश्न विचारला असता, आदित्य ठाकरे यांनी पेग, पेंग्विन, पार्टी पलीकडे काय केले, असे सांगत त्यांच्यावर जळजळीत टीका केली (Ashish Shelar Criticize Aditya Thackeray) आहे.
पेग, पेंग्विन अन् पार्टी यापलीकडे काहीच नाही; आशिष शेलारांची आदित्य ठाकरेंवर शेलक्या शब्दात टीका
शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघांत जांभोरी मैदानात भाजपकडून दहीहंडी, नवरात्रोत्सव व आता दीपावली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावरून भाजपने हे मैदान आपल्या फायद्यासाठी हायजॅक केल्याची टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून होत आहे. या मुद्द्यावरून मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना प्रश्न विचारला असता, आदित्य ठाकरे यांनी पेग, पेंग्विन, पार्टी पलीकडे काय केले, असे सांगत त्यांच्यावर जळजळीत टीका केली (Ashish Shelar Criticize Aditya Thackeray) आहे. मुंबईत ते बोलत होते.
वरळीत आदित्य ठाकरेंचे काय योगदान? : याप्रसंगी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, मुंबईच्या जनतेशी आमची नाळ जुळली आहे. मुंबईमध्ये आम्हाला जनतेचा भरभरून प्रतिसाद भेटत आहे. आदित्य ठाकरे यांनी इतक्या वर्षात वरळीमध्ये किती मराठी साहित्य, मराठी कला, मराठी लोककला महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले ते त्यांनी सांगावे असा प्रश्नही शेलार यांनी उपस्थित केला आहे. मुंबईत ते बोलत होते.
सुषमा अंधारे व भास्कर जाधव बाटगे? : शिवसेने पूर्वीची राहिली नसून शिवसेनेमध्ये बाटगे भरलेले आहेत. हे बाटगे राज्यात, मुंबईत अस्थिरता, अशांतता, वाद विवाद निर्माण करण्याचे काम करत आहेत, अशी टीकाही शेलार यांनी सुषमा अंधारे व भास्कर जाधव यांच्यावर केली ( Criticism on Sushma Andhare ) आहे. शिवसेनेमध्ये आता मूळ शिवसैनिक राहिलाच नाही ( Party Broke Up Because Of Outsiders ) आहे. जे मूळ बाळासाहेबांचे शिवसैनिक होते ते बाळासाहेबांची शिवसेना यासोबत शिंदे यांच्याकडे आलेले आहेत. काही थोडेफार मुळ शिवसैनिक राहिलेले आहेत. ते अशा पद्धतीचा वाद विवाद, अशांतता अशी परिस्थिती कधीच निर्माण करणार नाहीत. बाहेरून आलेले बाटगे हेच अशी काम करत असल्याची टीकाही शेलार यांनी केली आहे. आपल्यावर बोलणाऱ्यांवर गुन्हा नोंद करा. याचे पुरस्कर्ते, प्रमुख हे स्वतः उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी तर व्हाट्सअप व फेसबुक याच्यावर पोस्ट केल्याप्रकरणी सुद्धा लोकांवर गुन्हे दाखल केलेले आहे. म्हणून त्यांना इतरांवर बोलण्याचा अधिकार नाही असेही शेलार म्हणाले.