महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'रुग्णसेवा.. म्हणजेच परमो धर्म', नायरमधील डॉक्टरांनी केलं रक्तदान

कोरोनामुळे देश लॉकडाऊन असून सोशल डिस्टन्सही पाळावा लागत आहे. परिणामी मुंबईसह देशातील रक्तदान शिबीर रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रक्तदानासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला नायर रुग्णालयातील मार्डच्या डॉक्टरांनीही साद दिली आहे. आज(रविवार) नायरमधील 66 निवासी, इंटर्न डॉक्टरांनी रक्तदान केले आहे.

नायरमधील डॉक्टरांनी केलं रक्तदान
नायरमधील डॉक्टरांनी केलं रक्तदान

By

Published : Mar 30, 2020, 8:56 AM IST

मुंबई - मुंबईतील निवासी डॉक्टर, इंटर्न डॉक्टर, वरिष्ठ डॉक्टर असे सगळेच जीवाची बाजी लावत कॊरोनाशी लढा देत आहेत. 'रुग्णसेवा हाच परमो धर्म' म्हणत रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांनी आता यापुढे जात रक्तदान ही केलं आहे. नायर रुग्णालयातील 66 डॉक्टरांनी रक्तदान करत एक वेगळा आदर्श घालून दिला.

नायरमधील डॉक्टरांनी केलं रक्तदान

कोरोनामुळे देश लॉकडाऊन असून सोशल डिस्टन्सही पाळावा लागत आहे. परिणामी मुंबईसह देशातील रक्तदान शिबीर रद्द करण्यात आले आहेत. तर, कोरोनाच्या भीतीने आणि गैरसमजामुळे व्यक्तिगत स्तरावरही रक्तदानासाठी कुणी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यात रक्त टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रक्तदानासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला नायर रुग्णालयातील मार्डच्या डॉक्टरांनीही साद दिली आहे. आज(रविवार) नायरमधील 66 निवासी, इंटर्न डॉक्टरांनी रक्तदान केले आहे. तर, 66 बॅग रक्त जमा करत इतरांना रक्तदानासाठी पुढे येण्यास प्रोत्साहित करणाऱ्या या डॉक्टरांचे कौतुक होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details