मुंबई: मुंबईतील मरिन लाईन्स येथे 12 आणि नोव्हेंबर रोजी इंटरनॅशनल हलाल शो इंडिया कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आवाज उठवल्यानंतर हा शो रद्द करण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने बोगस हलाल प्रमाणपत्र आणि हलाल उत्पादक विक्रीवर बंदी घालावी, अशी मागणी हलाल सक्ती विरोधी कृती समितीने केली आहे.
हलाल सक्ती विरोधी कृती समितीची मागणी 6 खासगी संस्थांकडून प्रमाणपत्रगेल्या काही काळापासून भारतात हेतूतः हलाल उत्पादनांची मागणी वाढली आहे. हिंदू व्यापार्यांना व्यवसाय करण्यासाठी हलाल प्रमाणपत्र घेण्याची सक्ती जमियत-उलेमा-ए-हिंद यांसारख्या संस्थांकडून केली जात आहे. सुमारे 6 खासगी संस्थांकडून प्रमाणपत्र देण्यात येतात. त्यासाठी वापरला जाणारा पैसा आतंकवादी कारवायांना प्रोत्साहन देत आहे. मुंबईत इस्लामिक जिमखाना येथे इंटरनॅशनल हलाल शो इंडिया कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
इंटरनॅशनल हलाल शो ला जोरदार विरोधहलाल उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘ब्लॉसम इंडिया’ या संस्थेने हा कार्यक्रम हाती घेतला होता. हलाल सक्ती विरोधी कृती समितीने याविरोधात आवाज उठवला. तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पोलिस आयुक्तांना निवेदन देण्यात आली. आंदोलने, भव्य मोर्चा, सोशल मिडियाद्वारे जनप्रबोधन आदी माध्यमांद्वारे या इंटरनॅशनल हलाल शो ला जोरदार विरोध केला. वाढत्या विरोधानंतर संबंधित संस्थेने हा कार्यक्रम गुंडाळला आहे.
सुनील घनवट यांची मागणी भारतात खाद्यपदार्थांना प्रमाणपत्र देण्यासाठी केंद्र सरकारची अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अन राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन हे विभाग असताना वेगळे हलाल प्रमाणपत्र देणे म्हणजे शासनाच्या नियमांना डावलण्याचा प्रकार आहे. हलला प्रमाणपत्राच्या माध्यमातून वेगळी अर्थव्यवस्था निर्माण करुन देशातील व्यापाऱ्यांना वेठीस धरणे हा एकप्रकारे राष्ट्रद्रोह आहे. या राष्ट्रविरोधी कार्यक्रमाविषयी राष्ट्रप्रेमी नागरिकांमध्ये असंतोषाची भावना आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने अशा संस्थांवर बंदी घालावी, अशी मागणी हिंदू जनजागृति समितीचे महाराष्ट्र छत्तीसगढचे संघटक सुनील घनवट यांनी केली आहे. तसेच या संदर्भात पत्रव्यवहार केल्याचेही ते म्हणाले आहेत.