नवी मुंबई - खारघरमध्ये मृत कावळ्याचा संख्येत भर पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एकीकडे कोरोना महामारीचे संकट उभे असताना दुसरीकडे अनेक राज्यात बर्ड फ्ल्यूचा फैलाव वाढत आहे. मात्र, अफवांवर कोणत्याही प्रकारे विश्वास ठेवू नये, असे आवाहन पनवेल महानगरपालिकेने केले आहे.
खारघरमध्ये मृत कावळ्यांच्या संख्येत वाढ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण खारघर मध्ये आढळून आले मृत कावळे:खारघर सेक्टर 19 मधील पोलीस समिश्र सोसायटीच्या आवारात गुरुवारी सात तारखेला एक कावळा मृतावस्थेत आढळून आला होता. व 9 जानेवारीला सेक्टर 19 मध्ये आणखी एक कावळा मृत आढळून आला तसेच सामाजिक कार्यकर्त्यां बिना गोगरी यांच्या शाश्वत फाउंडेशन कार्यालया समोर तर 10 तारखेला प्रिया टॉवरच्या प्रांगणात कावळा मृत अवस्थेत पडून आल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. तसेच खारघर मधील रस्त्यावर आणखी दोन कावळे मृत अवस्थेत पडून आले. गेल्या चार दिवसात खारघर मध्ये 7 कावळे व 2 साळुंखी पक्षी नागरिकांच्या मृत अवस्थतेत निदर्शनास आले. खारघर वसाहती प्रमाणे इतर परिसरातही कावळे मृत अवस्थेत पडून असतील अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.
बर्ड फ्ल्यूच्या फैलावामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण:कोरोना या महामारीचे संकट असताना अनेक राज्यात बर्ड फ्ल्यूचा फैलाव वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भारती विद्यापीठच्या मागील बाजूस दोन कावळे तर खारघर रेल्वे स्थानक परिसरात एक कावळा आणि दोन साळुंखी पक्षी मृत अवस्थेत आढळून आले आहे.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पालिकेचे आवाहन:खारघर मध्ये आढळून आलेल्या मृतावस्थेतील कावळे व साळुंख्या यामुळे परिसरात अनेक चर्चा अफवांना उधाण आले आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे.