महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्रात "शत प्रतिशत" भाजपसाठी अमित शाह यांचे प्रयत्न सुरू, दिल्लीत कोर कमिटीशी चर्चा

लोकसभा निवडणुकीत देशभरात घवघवीत यश मिळवल्यानंतर आता अमित शाह यांनी देशातल्या विधानसभा निवडणुकींकडे लक्ष वळवले आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या अनेक विधानसभा मतदार संघात भाजपने आघाडी घेतली असल्याने शहा यांना राज्यांत पूर्ण बहुमत अपेक्षित आहे, असे भाजपच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले.

By

Published : Jun 9, 2019, 4:10 PM IST

Updated : Jun 9, 2019, 7:42 PM IST

CM Devendra fadnvis addressing with party president amit shah, raosaheb danve etc

मुंबई - महाराष्ट्रात शिवसेना भाजपसोबत सत्तेत असली तरी गेली साडे चार वर्षे शिवसेनेने भाजपची अनेकदा राजकीय कोंडी केली आहे. राम मंदिराच्या मुद्यावरही शिवसेनेने कुरघोडी सुरूच ठेवली असल्याने आगामी विधानसभेत "शत प्रतिशत भाजप" यासाठी पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी त्यांनी आज दिल्लीत पक्ष कार्यलयात महाराष्ट्र कोर कमिटीशी चर्चा केली. आगामी काळात महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड मध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. यामुळे शाह यांनी या तिन्ही राज्यांच्या कोर कमिटीला दिल्लीतील पक्षाच्या मुख्य कार्यालयात बोलावले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकसभा निवडणुकीत देशभरात घवघवीत यश मिळवल्यानंतर आता अमित शाह यांनी देशातल्या विधानसभा निवडणुकींकडे लक्ष वळवले आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या अनेक विधानसभा मतदार संघात भाजपने आघाडी घेतली असल्याने शहा यांना राज्यांत पूर्ण बहुमत अपेक्षित आहे, असे भाजपच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह उपाध्यक्ष सुरजित सिंग ठाकूरही दिल्लीत आहेत. शिवसेना आणि भाजप मधल्या जागावाटपाबाबतही शहा यांच्या सोबत कोर कमिटी सदस्य चर्चा करणार आहेत.

मंत्री मंडळ विस्ताराबाबत होणार अंतिम निर्णय
भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या सोबत चर्चा झाल्यानंतर राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब होणार आहे. मात्र भाजपच्या कोणत्याही नेत्याला या मंत्रिमंडळात संधी देण्यात येणार नाही. भाजप कोट्यातून राधाकृष्ण विखे पाटील तर शिवसेनेच्या कोट्यातून राष्ट्रवादीतून सेनेत आलेलं जयदत्त क्षीरसागर यांनी संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Last Updated : Jun 9, 2019, 7:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details