महाराष्ट्र

maharashtra

CNG PNG Rate Increase: महागाईच्या झळा! आजपासून सीएनजीसह पीएनजी दरात वाढ

By

Published : Nov 5, 2022, 11:24 AM IST

अगोदरच महागाईने होरपळलेल्या जनतेला आता सीएनजी व पीएनजी दरात वाढ झाल्याने महागाईचे अधिक चटके सोसावे लागणार आहेत. महानगर गॅस लिमिटेडने मुंबई महानगरात सीएनजी आणि पीएनजी प्रति किलो दरात अनुक्रमे ३ रुपये ५० पैसे आणि १ रुपया ५० पैसे वाढ केली आहे ही वाढ आज शनिवार (दि. ११ नोव्हेंबर)पासून लागू झाली आहे. (CNG PNG Rate Increase) त्यामुळे सीएनजीचा नवा दर प्रती किलो ८९ रुपये ५० पैसे आणि पीएनजीचा नवा दर ५४ रुपये एवढा झाला आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो

मुंबई - आंतरराष्ट्रीय पातळीवर नैसर्गिक वायूच्या दरात झालेली वाढ आणि केंद्र सरकार ने ऑक्टोंबर २०२२ पासून केलेली ४० टक्के वाढ यामुळे होईल ही दरवाढ करावी लागत असल्याचे महानगर गॅसने सांगितले आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला केंद्र सरकारने आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत देशांतर्गत उत्पादित गॅसच्या किमतीत ४० टक्क्यांनी वाढ केली आहे. याआधी एप्रिलमध्येही पहिल्या सहामाहीत गॅसच्या किमतीत ११० टक्के वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यातील जनतेला महागाईची झळ सहन करावी लागणार आहे. मुंबई महानगरात रिक्षा आणि टॅक्सी सीएनजीवरच धावतात. त्यांना या दरवाढीचा फटका बसणार आहे. घरगुती गॅस वापरणाऱ्यांच्याही खिशाला आता कात्री लागणार आहे.

दोन महिन्यात किंमत कमी केली पुन्हा कमी वाढवली -यापूर्वी १७ ऑगस्टला सीएनजीच्या दरात सहा रुपये आणि पीएनजीच्या दरात चार रुपयांनी कपात करण्यात आली होती. त्यानंतर ४ ऑक्टोंबरला पुन्हा सीएनजीच्या दरात सहा रुपयांची आणि पीएनजीच्या दरात ४ रुपयांची वाढ केली गेली. परिणामी सीएनजीचा दर ८६ रुपये तर पीएनजीचा दर ५२ रुपये ५० पैसे झाला होता. आता पुन्हा एकदा ही दरवाढ करून ती आजपासून लागू करण्यात आली आहे.

८ महिन्यांत ३० रूपयांची वाढ -एप्रिल महिन्यात सीएनजीचे दर ६० रुपये प्रति किलो होते. परंतु त्यात आता ३० रूपयांची वाढ होऊन ते ८९.५० रूपयांवर पोहोचले आहेत. तर पीएनजीच्या किंमतीत ३६ रूपये प्रति एससीएमची वाढ झाली असून ते आता ५४ रूपये एससीएमवर पोहोचलेत. दरम्यान एपीएमनं गॅसच्या पुरवठ्यात १० टक्क्यांची कपात केली आहे. यानंतर मागणी पूर्ण करण्यासाठी अधिक खर्च करून बाहेरून इंधन मागवावं लागत असल्याची माहिती महानगर गॅस लिमिटेडकडून देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details