मुंबई - आज अखेर प्रलंबित असेलेला मंत्रीमंळाचा विस्तार झाला. यामध्ये १३ जणांना नव्याने संधी देण्यात आली आहे. यामध्ये भाजपला १०, शिवसेनेच्या २ तर आरपीआयच्या वाट्याला १ मंत्रीपद आले आहे. खाते वाटपात तावडे आणि राम शिंदे यांना धक्का देण्यात आला आहे. त्यांच्याकडील शालेय शिक्षण आणि जलसंधारण खाते काढून घेण्यात आले आहे.
नव्याने मंत्री पदाची शपथ घेतलेले आशिष शेलार यांना शालेय शिक्षण आणि क्रीडा तर राम शिंदे यांना पणन विभाग देण्यात आला आहे. तर शिवसेनेच्या तानाजी सावंत यांना जलसंधारण खाते देण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची आस लावून बसलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण खाते देण्यात आले आहे. तर राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन मंत्रीपद देण्यात आले आहे.
एकेकाळी मुख्यमंत्र्यांचे अतिशय निकट वर्तीय असलेले राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडील नगरविकास खाते योगेश सागर यांना देण्यात आले आहे. तर पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात दिलेला अन्न आणि नागरी पुरवठा विभाग संभाजी पाटील यांच्याकडे दिला आहे. संभाजी पाटील यांच्याकडे कामगार कल्याण विभागाची जबाबदारी संजय कुटे यांना देण्यात आली आहे. एकूण ४ मंत्र्यांच्या खात्यात बदल करण्यात आला आहे.
कोणाला कोणते मंत्रीपद