मुंबई :काही अज्ञात लोकांनी सचिन सोनवणे यांच्या शरीरात मायक्रोचिप बसवली आणि त्यांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक केल्याच्या दाव्याची चौकशी करण्याचे निर्देश मुंबईतल्या न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. बोरिवली महानगर दंडाधिकारी बी. एन. चिकणे यांनी शहराच्या चारकोप पोलिसांना एफआयआर नोंदवून तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भातील आदेश गेल्या महिन्यात पारित करण्यात आला होता. मात्र तो सोमवारी माध्यमांना उपलब्ध करून देण्यात आला. न्यायालयाने पोलिसांना लवकरात लवकर अंतिम अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. तक्रारीशी संबंधित कागदपत्रे चारकोप पोलीस ठाण्यात सायबर गुन्हे शाखेकडे आवश्यक कारवाईसाठी पाठवावीत, असंही त्यांनी सांगितलं.
शरीरात मायक्रोचिप बसवून सोशल मीडिया अकाऊंट हॅक केल्याच्या दाव्याची चौकशी करा: कोर्टाचे निर्देश
Hacking Social Media Accounts By Implanting Microchip : मुंबईतील न्यायालयानं सचिन सोनवणे नावाच्या व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले. सचिन सोनवणे यांनी त्यांच्या शरीरात मायक्रोचिप बसवून त्यांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक केल्याचा आरोप केला आहे.
By PTI
Published : Jan 16, 2024, 4:14 PM IST
या प्रकरणाचा सविस्तर तपास करावा : सचिन सोनवणे नावाच्या व्यक्तीने आपले सर्व सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याची तक्रार केली होती. त्यानंतर कोर्टाने हे निर्देश दिले आहेत. हॅकरने शरीरात मायक्रोचिप टाकून हे कृत्य केल्याचा संशय सचिनने व्यक्त केला आहे. पासवर्ड बदलण्यासारखी सर्व खबरदारी घेतल्यानंतरही हॅकरने नवीन जी-मेल अकाउंटसह इतर सोशल मीडिया अकाउंट हॅक केल्याचा दावाही त्यांनी केला. त्यामुळे आपल्याला खूप त्रास सहन करावा लागला आहे, असं सचिनने वकील प्रकाश साळसिंगीकर यांच्यामार्फत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. काही अज्ञात व्यक्तीने मायक्रोचिपचा वापर करून त्याच्या हृदयाची गती अनेकवेळा वाढवली होती आणि त्यामुळे त्याच्या जीवाला धोका असल्याचा दावाही त्यांनी केला. सचिनचा अर्ज आणि प्रतिज्ञापत्र विचारात घेतल्यानंतर, न्यायालयाने सांगितलं की प्रथमदर्शनी असे दिसते की हा गुन्हा माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 420 (फसवणूक) अंतर्गत येतो. अशा परिस्थितीत सायबर गुन्ह्यांसाठी खास नेमलेल्या पोलिसांनी या प्रकरणाचा सविस्तर तपास करावा, असं न्यायालयाने म्हटलं आहे.
हेही वाचा :