मुंबई : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या ( Senior Bharatiya Janata Party leader Kirit Somaiya ) यांच्या पी.एच.डी डिग्री बाबत शिवसेना ठाकरे गटाकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. किरीट सोमय्या यांच्याजवळ वाणिज्य विभागात डॉक्टरेट झालेली मुंबई विद्यापीठाची डिग्री बोगस ( Mumbai University bogus degree ) असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांकडून सातत्याने करण्यात ( Allegations by Shiv Sena leaders ) येत आहे.
मुद्दा हिवाळी अधिवेशनात चर्चेला घेण्यात यावा :या मुद्द्यावर अद्याप कोणतीच स्पष्टता येत नसल्याने हा मुद्दा हिवाळी अधिवेशनात चर्चेला घेण्यात यावा याबाबतची मागणी ठाकरे गटाच्या युवासेनेकडून करण्यात येत आहे. युवा सेनेच्या सिनेट सदस्याकडून भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी 2005 साली घेतलेल्या डॉक्टरेट पदवी बोगस असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या डिग्री बाबत शंका निर्माण होत असल्याने, मुंबई विद्यापीठाने या संबंधित खुलासा करावा. याबाबतचे पत्र मुंबई विद्यापीठाला दिले होते. यासोबतच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांना देखील याबाबतची विचारणा करण्यात आली होती. तर तेथेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही युवा सेनेच्या सिनेट सदस्यांकडून पत्र देऊन याबाबत चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप कोठूनही प्रतिसाद मिळत नसल्याने सिनेट सदस्यांचा आहे. युवा सेनेचे माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत राजन कोळंबेकर, प्रवीण पाटकर, मिलिंद साटम यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून किरीट सोमय्या यांच्या डिग्रीबाबत विचारणा केली होती.