महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज..आत्ता..सायंकाळी ७ वाजेपर्यंत महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर

लोकसभा निवडणुकीच्या ७ व्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पार पडली. तर मतदानाच्या एक दिवस आधीच आमच्या बोटावर जबरदस्तीने शाई लाऊन ५०० रुपये दिले, असा गंभीर आरोप चंदोलीमधील तारा जीवनपूर गावातील गावकऱ्यांनी केला आहे. दुसरीकडे गेल्या २४ तासात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दोनदा भेट घेतली आहे. बीडमध्ये पाणी टंचाईचा तिसरा बळी गेला असून पाण्याची टाकी अंगावर पडून महिलेचा मृत्यू झाला. 'होय ... मी समलैंगिक आहे', भारतीय महिला धावपटू दुती चंदने केला धक्कादायक खुलासा..

By

Published : May 19, 2019, 7:00 PM IST

लोकसभा

सातव्या टप्प्यातील मतदान संपले, एकूण ६०.२१ टक्के मतदान; ७३.०५ टक्क्यांसह बंगाल आघाडीवर

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या ७ व्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पार पडली. आज ७ राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशात ५९ जागांसाठी मतदान झाले. या टप्प्यात सरासरी ६०.२१ टक्के मतदान झाले असून ७३.०५ टक्क्यांसह बंगाल आघाडीवर आहे.

सविस्तर वृत्त

भाजपचा प्रताप..! मतदानापूर्वीच ५०० रुपये देऊन मतदारांच्या बोटावर लावली शाई; गावकऱ्यांचा आरोप

चंदोली (उत्तर प्रदेश) - मतदानाच्या एक दिवस आधीच आमच्या बोटावर जबरदस्तीने शाई लाऊन ५०० रुपये दिले, असा गंभीर आरोप चंदोलीमधील तारा जीवनपूर गावातील गावकऱ्यांनी केला आहे. आज येथे लोकसभेच्या सातव्या टप्प्यातील मतदान होत असताना ही घटना समोर आली.

सविस्तर वृत्त

दिल्लीत घडामोडींनी वेग, गेल्या २४ तासात चंद्राबाबूंनी दोनदा घेतली राहुल गांधी आणि पवारांची भेट

नवी दिल्ली - लोकसभा मतदानाचा शेवटचा टप्पा आज पूर्ण होत आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत विरोधकांच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. गेल्या २४ तासात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दोनदा भेट घेतली आहे. तसेच माकपचे सिताराम येचुरी यांचीही नायडू यांनी भेच घेतली. त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सविस्तर वृत्त

बीडमध्ये पाणी टंचाईचा तिसरा बळी; पाण्याची टाकी अंगावर पडून महिलेचा मृत्यू

बीड - जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून दूरवरून दुचाकीवर पाणी आणताना पाण्याची टाकी (बॅरल) अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे बीड तालुक्यात घडली. मीनाक्षी अनुरथ घुगे (वय 26, रा. गुंजाळा, ता. बीड ) असे मृत महिलेचे नाव आहे.

सविस्तर वृत्त

'होय ... मी समलैंगिक आहे', भारतीय महिला धावपटू दुती चंदचा धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली - भारताची महिला धावपटू दुती चंदने गेल्या दिवसांपासून एका मुलीसोबत समलैगिंक संबंधात असल्याचे कबूल केले आहे. लोक तिच्या पार्टनरला टीकेचे धनी बनवतील या भीतीने २३ वर्षीय दुतीने तिच्या जोडीदारीणीचे नाव स्पष्ट केले नाही. दुतीने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत २०१८ च्या आशियाई स्पर्धेत दोन रौप्य पदक जिंकले आहेत.

सविस्तर वृत्त

ABOUT THE AUTHOR

...view details