महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज.. आत्ता... मंगळवारी दुपारी २ पर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर...

मनमोहन सिंग यांनी देशातील वाढत्या असमानतेबाबत चिंता व्यक्त केली आहे, तर दुसरीकडे विधिमंडळ अधिवेशनात अजित पवार सभागृहात भडकले. मुंबईतील दादर परिसरात भाजीविक्रेत्याने ग्राहकाचा खून केला आहे, तर पुण्यात एका वारकरी माऊलीने हलगी वादन केले आहे. आज सई ताम्हणकरच्या जन्मदिनानिमित्त तिच्या 'सईहोलिक्स' हा फॅनक्लबने गरजू मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे.

महत्त्वाच्या घडामोडी

By

Published : Jun 25, 2019, 2:30 PM IST

देशातील वाढती असमानता चिंतेची बाब - मनमोहन सिंग

नवी दिल्ली- माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशातील वाढत्या असमानतेवर चिंता व्यक्त केली आहे. मनमोहन सिंग म्हणाले, कल्याणकारी राज्य असताना देशात खूप गरीबी किंवा आर्थिक विषमता असू शकत नाही. वाचा सविस्तर...

विधिमंडळ अधिवेशन: अधिकारी झोपा काढतात का, अजित पवार सभागृहात भडकले

मुंबई - पाणी बील थकल्याने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याला महापालिकेने दिवाळखोर म्हणून घोषित केले. या मुद्यावरुन विधानसभेत आज चांगलीच घमासान झाली. याच मुद्यावरुन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार चांगलेच भडकले. अधिकारी झोपा काढतात का? असा संतप्त सवाल पवार यांनी विधानसभेत केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुमासदार उत्तर दिले. आम्ही आंघोळ केल्याशिवाय सभागृहात येणार नाही. आम्हाला आंघोळ करू द्या, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. वाचा सविस्तर...

१० रुपयांचा वाद जीवावर बेतला; भाजी चिरायच्या चाकूनेच कापला गळा

मुंबई - रस्त्यावर भाजी विक्रेत्यासोबत केवळ १० रुपयांच्या वादातून ग्राहकाचा खून झाल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा दादर परिसरात घडली. भाजी विक्रेत्याने ग्राहकाच्या मानेवर आणि हातावर वार केले. त्यामध्ये ग्राहकाचा मृत्यू झाला. वाचा सविस्तर...

माऊलीची पालखी अन् माऊलीची हलगी : ८० वर्षांच्या आजीबाईंचे अफलातून 'हलगी वादन'

पुणे - संत ज्ञानेश्वर माऊलींचा महिमा अफाट आहे, हे काही वेगळे सांगायला नको. आषाढी वारीत बालपणापासून ते वयाच्या 80 व्या वर्षी देखील एक आजीबाई पालखी सोहळ्यांमध्ये हलगी वाजवतात. त्यांच्या तालावर महिला वारकऱ्यांची फुगडी चालते. वाचा सविस्तर...

सईच्या वाढदिवसाचं हटके सेलिब्रेशन, 'सईहोलिक्स'ने फुलवलं गरजू मुलांच्या चेहऱ्यावर हास्य

मुंबई - अभिनेत्री सई ताम्हणकर जेवढी रूपेरी पडद्यावर सुंदर, सशक्त आणि संवेदनशील अभिनेत्री आहे. तेवढीच ती आपल्या वैयक्तिक आयुष्यातही आहे. हे तिच्या सामाजिक जीवनातल्या वावरावरून नेहमीच दिसून आलंय. सईचा समाजकार्यांमध्ये सक्रिय सहभाग असतो. तिचा 'सईहोलिक्स' हा फॅनक्लबही सोशल मीडियावर सईचे हेच विचार पुढे घेऊन जात आहे. आज सईचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त 'सईहोलिक्स' या ग्रुपने गरजु विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे.वाचा सविस्तर...

*बातमी, सर्वांच्या आधी*

https://www.etvbharat.com/marathi/maharashtra

ABOUT THE AUTHOR

...view details