मुंबई- निसर्ग चक्रीवादळाबरोबर आलेल्या पावसाने शहरातील वायू गुणवत्तेच्या निर्देशांकात सकारात्मक परिणाम केल्याचे दिसून येत आहे. आज वायू गुणवता निर्देशांक हे 17 इतके आहे. ही वर्षभरातील सर्वात चांगली आकडेवारी असल्याचे एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे निसर्ग चक्रीवादळ धडकल्यानंतर मुंबईत पावसाला सुरुवात झाली होती. आजही मुंबईत पाऊस सुरू आहे. मात्र, पावसामुळे शहरातील वायूमध्ये सुधार घडला आहे. सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR) च्या अधिकृत संकेतस्थळानुसार आज दुपारी वायू गुणवत्तेची नोंद घेण्यात आली. सध्या शहरातील हवा गुणवत्ता चांगल्या श्रेणीत येते. यामुळे आरोग्यास कमी किंवा फारच धोका नसल्याचे दिसून आले आहे.