महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 18, 2020, 11:48 AM IST

ETV Bharat / state

LOCKDOWN : '२० एप्रिलनंतर औद्योगिक-व्यावसायिक उपक्रम सुरू, जीवनावश्यक वस्तू विनाअडथळा मिळतील'

लोकांना अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू विना अडथळा मिळत राहतील. 20 एप्रिलनंतर राज्यातील काही भागात पुरेशी काळजी घेऊन तसेच अटी व शर्तींच्या अधीन राहून औद्योगिक, व्यावसायिक उपक्रमांना सुरू करण्यात येत आहे,अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

industrial and commercial activities will begin say cm udhav  thackray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - लोकांना अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू विनाअडथळा मिळत राहतील. 20 एप्रिलनंतर राज्यातील काही भागात पुरेशी काळजी घेऊन तसेच अटी व शर्तींच्या अधीन राहून औद्योगिक, व्यावसायिक उपक्रमांना सुरू करण्यात येत आहे, जेणेकरून अर्थव्यवस्थेचे चक्र हळूहळू का होईना फिरत राहील. यादृष्टीने सुधारित मार्गदर्शक आदेश जारी करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

अर्थातच कोरोनाचा मुकाबला करणे हे लॉकडाऊनचे मूळ उद्दिष्ट्य अबाधित राहून कंटेंनमेंट क्षेत्र घोषित केलेली ठिकाणे वगळून इतरत्र स्थानिक प्रशासनाच्या अधिकारात हे सुधारित आदेश लागू राहतील

केंद्राने निर्देश दिल्याप्रमाणे लॉकडाऊन 3 मे पर्यंत आहे. त्याचे अतिशय काटेकोर पालन करायचे आहे. सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छतेचे नियम पाळणे, नियमित मास्क घालणे या व अशा कोणत्याही बाबी शिथिल करण्यात आलेल्या नाहीत.

कुठल्याही कारणांसाठी गर्दी झालेली चालणार नाही. धार्मिक उत्सव, प्रार्थनास्थळांवरील गर्दी, मेळावे, खेळाच्या स्पर्धा, परिषदा, सभा यांच्या आयोजनाला परवानगी असणार नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details