मुंबई :Central Railway : अखेर एक तासांच्या खोळंबानंतर मध्य रेल्वे सुरु झाली ( Central Railway started After an hour ) आहे. मात्र प्रवाशांची रेल्वे ट्रेकवर पायपीट करायला लागल्यानंतर ही रेल्वे सेवा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला ( passengers on railway tracks ) आहे. १२ वाजून ४० मिनिटांपासून मध्य रेल्वेच्या करी रोड पासून ते छत्रपती शिवाजी छत्रपती टर्मिनस दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल ट्रेन एकाच रांगेत उभ्या राहिल्या होत्या. परिणामी जनता वाट पाहून कंटाळली.
रेल्वे रुळावरून प्रवाश्यांची पायपीट :रेल्वे रुळावरून सीएसएमटीकडे अखेर प्रवाश्यांनी रेल्वे रुळावरून पायी सुरू केली होती निघाले. रेल्वेच्या नेहमीच्या ह्या ट्रेन लेटमुळे जनता मात्र वैतागली आहे. रेल्वेच्या तिन्हीमार्गावर दररोज ट्रेन अचानक थांबते, उशीरा धावते, कुठे तांत्रिक बिघाड झाला तर तिथून मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी ए के सिंग यांना विचारले असता कोणताही मोठा बिघाड नसल्याचे त्यांनी १२.४३ मिनिटांनी फोनवर संपर्क केला असता सांगितले. मात्र आजचा अडथळा मोठा होता. याची कल्पना त्यांना आली नसल्याचे त्यांच्या निष्कळजीच्या स्वरातून स्पष्टपणे जाणवले.