महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार- अजित पवार

घराबाहेर पडून रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांमुळे कोरोना विषाणूची साथ पसरण्याचा धोका वाढला आहे. रस्त्यावर गर्दी करणाऱ्या मोजक्या निर्बुद्धांमुळे राज्यातील जनतेच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. राज्य शासनाने आतापर्यंत संयमाने घेतले, परंतु हा संयम कायम ठेवणे यापुढे शक्य नाही. बंदी आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करणारच, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

corona mumbai
अजित पवार

By

Published : Mar 24, 2020, 9:46 AM IST

मुंबई- कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने काही निर्बंध घातली आहे. मात्र, त्याचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्याचबरोबर, रस्त्यावर अकारण फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल. गरज पडल्यास राज्यात संचारबंदीही लागू केल्या जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

घराबाहेर पडून रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांमुळे कोरोना विषाणूची साथ पसरण्याचा धोका वाढला आहे. रस्त्यावर गर्दी करणाऱ्या मोजक्या निर्बुद्धांमुळे राज्यातील जनतेच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. राज्य शासनाने आतापर्यंत संयमाने घेतले, परंतु हा संयम कायम ठेवणे यापुढे शक्य नाही. बंदी आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करणारच, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

कोरोनाची साथ पसरू नये, यासाठी शासन आवश्यक ती सर्व पावले उचलेल. त्याचबरोबर, परिस्थितीचा आढावा घेऊन संपूर्ण राज्यात संचारबंदीचा निर्णय घेतला जावू शकतो. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयांचे, निर्बंधांचे पालन राज्यातील बहुतांश जनता करत आहे. राज्याचा आरोग्य विभाग, पोलीस विभाग, स्थानिक स्वराज संस्थांचे तसेच प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी त्यांची जबाबदारी जिवाचा धोका पत्करून उत्तमपणे पार पाडत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

या सर्वांची मेहनत राज्यशासन वाया जावू देणार नाही. त्यासाठी शासनाच्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्याशिवाय पर्याय नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. विलगीकरण केलेल्या संशयितांनी निर्बंध मोडून लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करू नये, तसे केल्यास त्यांच्यावरही गुन्हे दाखल करून कारवाई करू, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

हेही वाचा-सर्व ईएमआय, इन्स्टॉलमेंट्सची वसुली तात्पुरती थांबवा, अशोक चव्हाणांची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details