महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 1, 2023, 5:58 PM IST

ETV Bharat / state

ACB Trap Statistics Maharashtra : राज्यात गेल्या वर्षात १ हजार जण लाचखोरीच्या जाळ्यात; पुण्यात सर्वाधिक लाचखोर

शासकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच (rise in bribery) आहे. 2022 या वर्षात राज्यात 1 हजार 16 जणांना लाच घेताना रंगेहाथ अटक (red handed arrests for accepting bribes) करण्यात आली आहे. लाचलुचपतप प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एकूण 719 लाच घेणाऱ्यांवर सापळे लावून ही कारवाई (ACB action against bribe takers) केली. त्याचप्रमाणे 2022 या वर्षात लाच प्रकरणात अटक झालेल्यांपैकी 29 प्रकरणाच लाचखोरीचे आरोप सिध्द झाले असून 38 लोकसेवक दोषी आढळले आहेत. (ACB Trap Statistics Maharashtra)

ACB Trap Statistics Maharashtra
१ हजार जण लाचखोरीच्या जाळ्यात

मुंबई : राज्याच्या लाचलुचपच प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) राज्यात 8 विभाग आहेत. (ACB Trap Statistics Maharashtra) या विभागानुसार लाचखोरांवर कारवाई (red handed arrests for accepting bribes) केली जाते. राज्यात 2022 या वर्षात लाच स्विकारतानाचे 719 गुन्हे दाखल करण्यात आले. (rise in bribery) त्यामध्ये 1 हजार 16 जणांना लाच घेताना रंगेहाथ अटक केली. (ACB action against bribe takers) सर्वाधिक म्हणजे 155 लाचखोर पुण्यात आढळले असून सर्वात कमी म्हणजे 42 लाचखोर मुंबईत आढळले आहे. इतर विभागात ठाणे (83) नाशिक (123) नागपूर (73) अमरावती (63) औरंगाबाद (120) आणि नांदेड (60) समावेश आहे. चालू वर्षात अपसंपदेचे 12 आणि इतर भ्रष्टाचाराचे 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

2022 मध्ये 38 लाचखोर दोषी : लाच प्रकरणातील लोकसेवकांवर न्यायालायात खटले चालविण्यात येतात. गेल्या वर्षात एकूण 29 लाच प्रकरणांचा निकाल लागला. त्यात 38 लोकसेवक दोषी आढळले आहेत. त्यात वर्ग-1च्या 3 वर्ग-2 च्या 2 आणि वर्ग 3 च्या 21 लोकसेवकांचा समावेश आहे. त्यांच्यावर एकूण 70 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे लाच घेताना रंगेहाथ पकडूनही 198 जणांना निलंबित करण्यात आलेले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details