महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आर्थिक राजधानीत सन २००८ ते २०१८ च्या दरम्यान तब्बल ५३ हजार ३३३ आगीच्या दुर्घटना

मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत सन २००८ पासून २०१८ पर्यंत तब्बल ५३ हजार ३३३ आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. तर या दुर्घटनेत तब्बल ६६६ लोकांना त्यांच्या प्राणास मुकावे लागले आहे. या घटनांमध्ये मृतांच्या आकड्यात ४०४ पुरुष, २२३ महिला, ३४ अल्पवयीन मुले व अग्निशमन दलाचे ५ अधिकारी असल्याचे माहिती अधिकाराखाली समोर आले आहे.

आर्थिक राजधानीत सन २००८ ते २०१८ च्या दरम्यान तब्बल ५३ हजार ३३३ आगीच्या दुर्घटना

By

Published : Jul 22, 2019, 8:10 PM IST

मुंबई- शहरात आगीच्या घटना या नित्याच्याच झाल्या आहेत. उंच इमारती, झोपडपट्ट्या, हॉटेल्स याठिकाणी आगीच्या घटना वारंवार होऊनसुद्धा यावर हव्या तशा उपाय योजना झालेल्या नाहीत. मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत सन २००८ पासून २०१८ पर्यंत तब्बल ५३ हजार ३३३ आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. तर या दुर्घटनेत तब्बल ६६६ लोकांना त्यांच्या प्राणास मुकावे लागले आहे. या घटनांमध्ये मृतांच्या आकड्यात ४०४ पुरुष, २२३ महिला, ३४ अल्पवयीन मुले व अग्निशमन दलाचे ५ अधिकारी असल्याचे माहिती अधिकाराखाली समोर आले आहे.

सन २०१२ ते २०१८ दरम्यान घडलेल्या आगींच्या घटनांची आकडेवारी

२०१२-२०१३ मध्ये एकूण ४ हजार ७५६ आगीच्या घटना झाल्या आहेत. यात एकूण ६२ लोकांचा मृत्यू झाला असून त्यात ४४ पुरुष आणि १८ स्त्रियांचा समावेश आहे.
२०१३-२०१४ मध्ये एकूण ४ हजार ४०० आगीच्या घटना झाल्या आहेत. यात एकूण ५८ लोकांची मृत्यू झाला असून त्यात ३९ पुरुष आणि १९ स्त्रियांचा समावेश आहे.
२०१४-२०१५ मध्ये एकूण ४ हजार ८४२ आगीच्या घटना झाल्या आहेत. यात एकूण ३२ लोकांचा मृत्यू झाला असून त्यात २० पुरुष आणि १२ स्त्रियांचा समावेश आहे.
२०१५-२०१६ मध्ये एकूण ५ हजार २१२ आगीच्या घटना झाल्या आहेत. यात एकूण ४७ लोकांचा मृत्यू झाला असून त्यात ३४ पुरुष आणि १३ स्त्रियांचा समावेश आहे.
२०१६-२०१७ मध्ये एकूण ५ हजार २१ आगीच्या घटना झाल्या आहेत. यात एकूण ३४ लोकांचा मृत्यू झाला असून त्यात १८ पुरुष आणि १६ स्त्रियांचा समावेश आहे.
२०१७-२०१८ मध्ये एकूण ४ हजार ९२७ आगीच्या घटना झाल्या आहेत. यात एकूण ५५ लोकांचा मृत्यू झाला असून त्यात ३७ पुरुष आणि १८ स्त्रियांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details