मुंबई- शहरात आता पत्रकारांनाही करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मुंबईमध्ये ५३ पत्रकारांना करोनाचा संसर्ग झाला आहे. सर्वांची रवानगी आयसोलेशन कक्षामध्ये करण्यात आली आहे, तर यामुळे मुंबई महापौर किशोरी पेडणेकर देखील होम क्वारंटाईन झाल्या आहेत.
मुंबईत ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण, तर महापौरही झाल्या होम क्वारंटाईन
गेल्या आठवड्यात मुंबई महापालिकेने पत्रकार आणि कॅमेरामन यांची कोरोना चाचणी केली. त्यामध्ये १६८ जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी ५३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यामधील अनेकांना कोरोनाची लक्षणे देखील नव्हती.
मुंबईत ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण
गेल्या आठवड्यात महापालिकेने पत्रकार आणि कॅमेरामन यांची कोरोना चाचणी केली. त्यामध्ये १६८ जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी ५३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यामधील अनेकांना कोरोनाची लक्षणे देखील नव्हती. तसेच मुंबईच्या महापौरांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र, पत्रकारांची चाचणी करताना महापौर देखील उपस्थित होत्या आणि त्या अनेक पत्रकारांच्या संपर्कात देखील आल्या आहेत. त्यामुळे त्या स्वतः होमक्वारंटाईन झाल्या आहेत.