पाच तासांच्या चौकशीनंतर रवींद्र वायकर इओडब्ल्यूच्या कार्यालयातून बाहेर मुंबई :मुंबईतील 500 कोटींच्या कथित भूखंड घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्याची आर्थिक गुन्हे शाखेकडून तब्बल 5 तास चौकशी करण्यात आली आहे. रवींद्र वायकर यांना आर्थिक गुन्हे शाखेने 500 कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराच्या संदर्भात चौकशीसाठी बोलावले होते. आज दुपारी 12.15 वाजता वायकर ईओडब्ल्यूच्या कार्यालयात दाखल झाले होते. पाच तासांच्या चौकशीनंतर रवींद्र वायकर ईओडब्ल्यूच्या कार्यालयातून 5.10 वाजता बाहेर पडले.
रवींद्र वायकरांची 5 तास चौकशी: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपानुसार, वायकर यांनी गार्डनसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर पंचतारांकित हॉटेल बांधण्यासाठी बेकायदेशीरपणे मंजुरी मिळवली. ही मान्यता मिळवण्यासाठी त्यांनी राजकीय संबंध वापरले, ज्यामुळे बीएमसीचे मोठे नुकसान झाले. रवींद्र वायकरांची 5 तास चौकशी झाल्यानंतर संध्याकाळी ५:१० वाजता EOW कार्यालयातून बाहेर पडले.
५०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप: शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. गार्डनसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर पंचतारांकित हॉटेल बांधण्यास मंजुरी मिळवून ५०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहेत. त्याप्रकरणी वायकर यांची चौकशी सुरू आहे. ते आज दुपारी 12.15 वाजता आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आले होते. त्यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.
शेकडो कोटींचा घोटाळा : रवींद्र वायकर यांनी मातोश्री स्पोर्टस ट्रस्टचा आणि सुप्रीमो बँक्वेटच्या नावाने शेकडो कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप आहे. मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेले खुले क्रीडांगण व गार्डनसाठी असलेल्या जागेवर रवींद्र वायकर यांनी अनधिकृत कब्जा केला, असाही त्यांच्यावर आरोप सोमय्या यांनी केला होता. याच प्रकरणी त्यांची चौकशी सुरु आहे. तर गुन्हे शाखेकडून चौकशी झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना रवींद्र वायकर म्हणाले आहेत की, 500 कोटींचा घोटाळ्याचा आरोप करत तक्रार केली होती. मला आधीच बोलावले होते, पण मी वेळ वाढवून मागितला होता.
हेही वाचा -
- BMC On MLA Waikar Hotel Constriction : आमदार रवींद्र वायकर यांनी बांधकाम करण्यापूर्वी कळवले नसल्यामुळे स्थगिती; महापालिकेचा खुलासा
- Maharashtra Politics: सरकारवर भोपळा आणि खोक्यांचा आसूड; ही तर बिरबलची खिचडी- रवींद्र वायकर यांचा घणाघात
- MLA Ravindra Waikar Scam Case : रवींद्र वायकरांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी BMC चे अधिकारीही आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर?