महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Boca Virus in Mumbai : मुंबईकरांनो सावधान! बोका व्हायरस आलाय, 5 लहान मुलांना संसर्ग

पनवेलमध्ये पाच लहान मुलांवर उपचार करण्यात आले आहेत. या मुलांची परिस्थिती सध्या स्थिर आहे. गेल्या चार महिन्यांत बोका व्हायरसचा संसर्ग ( Boca virus in mumbai ) झालेल्या पाच बालकांवर उपचार करण्यात आले आहेत, असे बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. संदीप सावंत यांनी सांगितले. याबाबत पनवेल महापालिका आरोग्य विभागाने हा रुग्ण बोका व्हायरस सदृश्य व्हायरसने पीडित असल्याचे स्पष्ट केले असून लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

By

Published : Nov 12, 2022, 8:46 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

नवी मुंबई : नवी मुंबईतील खारघरमध्ये लहान मुलांसाठी घातक असलेल्या बोका व्हायरसचे रुग्ण ( Boca virus in mumbai ) सापडल्याने खळबळ उडाली आहे. दोन वर्षाच्या बाळाला या व्हायरसची लागण झाली असून, त्याच्यावर खारघर मधील मेडीकव्हर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बोका व्हायरस हा अत्यंत दुर्मिळ व्हायरस असून एक ते तीन वयोगटातील मुलांना त्याची लागण होत आहे. सुरूवातीला श्वास घेण्यास त्रास होतो. तसेच सर्दी खोकल्याची लक्षणे आढळत आहेत.

पाच मुलांना संसर्ग -पनवेलमध्ये पाच लहान मुलांवर उपचार करण्यात आले आहेत. या मुलांची परिस्थिती सध्या स्थिर आहे. गेल्या चार महिन्यांत बोका व्हायरसचा संसर्ग झालेल्या पाच बालकांवर उपचार करण्यात आले आहेत, असे बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. संदीप सावंत यांनी सांगितले. याबाबत पनवेल महापालिका आरोग्य विभागाने हा रुग्ण बोका व्हायरस सदृश्य व्हायरसने पीडित असल्याचे स्पष्ट केले असून लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.


कसे होते बोका व्हायरसचे निदान ? - 'बोका' व्हायरसचे नाक, शौच आणि रक्ताच्या नमुन्यांचे निदान पीसीआर चाचणीद्वारे केले जाऊ शकते. ही चाचणी खूप महाग असल्याने त्या चाचण्या नियमितपणे केल्या जात नाहीत. तीव्र स्वरूपाच्या श्वसनाचा त्रास असलेल्या मुलांमध्येच शक्यतो ही चाचणी केली जाते. या विषाणूच्या प्रादुर्भावाचे प्रमाण 1.5 टक्क्यांपासून ते 19.3 टक्क्यांपर्यत आहे. हा विषाणू वर्षभर आढळतो. परंतु, प्रामुख्याने हिवाळ्यात आणि हिवाळा तसेच उन्हाळ्याच्या मधल्या काही दिवसांमध्ये हा व्हायरस जास्त प्रमाणात आढळतो.


बोका व्हायरसची लक्षणे कोणती ? - बोका व्हायरस हा प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळून येतो. हिवाळ्यामध्ये या व्हायरसचा संसर्ग होण्याचा मोठा धोका असतो. बोका व्हायरसमध्ये टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 4 सारखे अनेक प्रकार आहेत. टाईप 1 विषाणू प्रामुख्याने श्वसनमार्गाच्या संसर्गाशी संबंधित आहे. टाईप 2 आणि 4 अतिसार, ओटी पोटात दुखणे इत्यादी लक्षणांसह गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी म्हणजेच पोटाच्या विकाराशी संबंधित संसर्ग आहे. हा विषाणू प्रामुख्याने तीन वर्षांखालील मुलांना संक्रमित करतो. या विषाणूची लक्षणे इतर इन्फ्लूएंझा विषाणूंसारखीच आहेत. खोकला, सर्दी आणि श्वसनमार्गाच्या संक्रमणाचा यात प्रामुख्याने समावेश होतो. त्यामुळे हा व्हायरस लवकर ओळखणे आव्हानात्मक ठरत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details