मुंबई - आज राज्यातील १० हजार २२५ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ही १५ लाख २४ हजार ३०४ इतकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.३१ टक्के एवढे झाले आहे.
आज राज्यात ४ हजार ९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले. राज्यात १०४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण ४४ हजार १२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६१ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९० लाख ६५ हजार १६८ नमुन्यांपैकी १६ लाख ८७ हजार ७८४ (१८.६२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५ लाख ३३ हजार ७८० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, १२ हजार १९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १ लाख १८ हजार ७७७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
हेही वाचा-ठरलं..! पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांवर 'या' दिवशी होणार मतदान