मुंबई - मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीसाठी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने नवी योजना तयार करण्यात आली आहे. खासगी डॉक्टरांच्या सहाय्याने धारावीतील 350 खासगी रुग्णालये आजपासून सुरू करण्यात आले आहेत.
धारावीत ३५० खासगी रुग्णालये सुरू, आज ४७ हजरांपेक्षा अधिक स्क्रिनिंग
धारावीमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. तसेच धारावीमध्ये दाटीवाटीची वस्ती असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे त्यांची घरोघरी जावून धारावीकरांचे स्क्रिनिंग केले जात होते. मात्र, डॉक्टरांना पीपीई किट घालून धारावीच्या लहान-लहान गल्ल्यांमध्ये जावून तपास जोखमीचे होते. त्यामुळे मुंबई महापालिकेने खासगी रुग्णालये सुरू करण्याचे आवाहन डॉक्टरांना केले होते.

मुंबई महापालिका आणि 'माहीम-धारावी मेडिकल प्रॅक्टिश्नर असोसिएशन' यांच्या समन्वयातून आजपासून धारावीत रुग्णालये सुरू करण्यात आले आहे. यासाठी धारावीतील ५ हॉटस्पॉट परिसर चाचणीसाठी निवडण्यात आले आहे. आज डॉक्टरांनी जवळपास ४७ हजार ५०० लोकांचे स्क्रीनिंग केले. त्यापैकी ४ हजार क्वारंटाईन जणांना करण्यात आले, तर ४४३ जणांचे स्वॅब चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या चाचणीदरम्यान, ८३ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती डॉ. अनिल पासनेकर यांनी दिली.