महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत ३ वर्षीय चिमुकला पडला उघड्या गटारात, बघा विचलित करणारा VIDEO

गोरेगाव पूर्वेकडील आंबेडकर नगरमध्ये एक 3 वर्षांचा चिमुकला नाल्यात पडल्याची घटना घडली आहे.

By

Published : Jul 11, 2019, 1:13 AM IST

Updated : Jul 11, 2019, 12:00 PM IST

मुंबईमध्ये तीन वर्षीय चिमुकला पडला नाल्यात, बचावकार्य सुरू

मुंबई- गोरेगाव पूर्वेकडील आंबेडकर नगरमध्ये एक 3 वर्षांचा चिमुकला नाल्यात पडल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेला 9 तास झाले असून अद्याप बचाव कार्य सुरू असल्याची माहिती विनयकुमार राठोड यांनी दिली आहे. दिव्यांश सिंह असे त्या मुलाचे नाव आहे.

मुंबईमध्ये तीन वर्षीय चिमुकला पडला नाल्यात, बचावकार्य सुरू

स्थानिकांच्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. ज्या नाल्यात मुलगा पडला तो नाला पुढे जाऊन मोठ्या नाल्याला मिळतो. सध्या सर्व नाले उघडले असून सर्वत्र शोधमोहीम सुरू आहे.

Last Updated : Jul 11, 2019, 12:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details