महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीची जागा स्वाभिमानी लढवणार; पुण्याबाबत सस्पेन्स कायम

सांगलीची जागा स्वाभिमानी लढवणार; पुण्याबाबत सस्पेन्स कायम...मी गुजरातमध्ये आल्याने काही जणांच्या पोटात दुखतयं - उद्धव ठाकरे...२३ मे'ला कौटुंबिक आनंद सोहळा - सुजय विखे...या सारख्या इतर राजकीय घडामोडींचा वाचा आढावा...

By

Published : Mar 30, 2019, 3:11 PM IST

Breaking News

  • सांगलीची जागा स्वाभिमानी लढवणार; पुण्याबाबत सस्पेन्स कायम

मुंबई- सांगली लोसभेची जागा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाच सोडली असल्याचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. तर पुण्याबाबत सस्पेन्स कायम ठेवत, उमेदवार आज संध्याकाळपर्यंत जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. रावेल लोकसभेसाठी उल्हास पाटीस पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. टिळकभवन येथ आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वाचा सविस्तर

  • मी गुजरातमध्ये आल्याने काही जणांच्या पोटात दुखतयं - उद्धव ठाकरे

गांधीनगर - भाजप अध्यक्ष अमीत शाह हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी येथे आलो आहे. याचा काही लोकांना आनंद झाला तर खुप जणांना आश्चर्य वाटत आहे. एवढच नव्हे तर काही जणांच्या पोटात दुखत आहे, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला. वाचा सविस्तर

  • २३ मे'ला कौटुंबिक आनंद सोहळा - सुजय विखे

अहमदनगर - आई-वडील मोठे नेते असताना आपल्या सभांमध्ये उपस्थित राहू शकत नाहीत. माझ्यासाठी भाषणे करू शकत नाहीत. याबाबत नगर-दक्षिण युतीचे उमेदवार असलेले डॉ. सुजय विखे यांनी दुःख व्यक्त केले. मात्र, त्याचबरोबर येत्या २३ मे रोजी निवडणूक निकालानंतर निश्चितपणे कौटुंबिक आनंद सोहळ्यात हे दुःख दूर होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पारनेर येथे आयोजित युतीच्या सभेनंतर ते माध्यमांशी बोलत होते. वाचा सविस्तर

  • गडकरी म्हणजे भ्रष्टाचाराचा सांड; विलास मुत्तेमवारांची जीभ घसरली जीभ

नागपूर - विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसच्या बुथचे उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले व माजी खासदार विलास मुत्तेमवार मंचावर उपस्थित होते. मात्र, आपल्या भाषणात गडकरींवर आरोप करताना मुत्तेमवारांची जीभ घसरली. त्यांनी गडकरींना 'भ्रष्टाचाराचा सांड' अशा शब्दात संबोधले आहे.वाचा सविस्तर

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पत्नीवर हल्ला; बीडमध्ये तणावाचे वातावरण

बीड - राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पत्नी सारिका सोनवणे यांच्यावर प्रचारादरम्यान एका माथेफिरूने कोयत्याने हल्ला केला. ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास केज तालुक्यातील धर्माळा येथे घडली.

ABOUT THE AUTHOR

...view details