महाराष्ट्र

maharashtra

सायन पुलावर टेम्पोची दुचाकींना धडक, दोघांचा मृत्यू

By

Published : Nov 28, 2019, 12:59 AM IST

Updated : Nov 28, 2019, 1:46 AM IST

भरधाव टेम्पोने ३ दुचाकींना दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सायन पुलावर घडली. या घटनेत चौघे जखमी झाले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान,  टेम्पो चालक आदेश वानखेडेला पोलिसांनी अटक केली आहे.

अपघात
अपघात

मुंबई - भरधाव टेम्पोने ३ दुचाकींना दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सायन पुलावर घडली. या घटनेत चौघे जखमी झाले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, टेम्पो चालक आदेश वानखेडेला पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा - भाजपच्या 'या' नेत्यांना सभागृहात लागली डुलकी...

सायन पुलावरील एका मार्गिकेवरून मुंबईच्या दिशेने येताना चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. भरधाव टेम्पोने धडक दिल्यानंतर तिनही दुचाकींवरील व्यक्ती दूर फेकल्या गेले. पुलावरील नागरिकांनी सतर्कता दाखवत अब्दुल वाहिद मोहम्मद रोशन, खालिदा अब्दुल वाहिद, अब्बास अली शेख, बादशाह मयुद्दीन, उमेश सहानी आणि एका महिलेला तात्काळ सायन रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान अब्दुल आणि खालिदा यांचा मृत्यू झाला असून अन्य जखमींवर उपचार सुरू आहे.

हेही वाचा - ...तर बंद होऊ शकते तुमचे ट्विटर अकाऊंट

Last Updated : Nov 28, 2019, 1:46 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details