महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 26, 2020, 1:23 PM IST

ETV Bharat / state

दिलासादायक..! कोरोनाच्या 15 रुग्णांना डिस्चार्ज

राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 124 झाली आहे. आज नव्याने मुंबईत 1 आणि ठाणे येथे 1 रुग्ण आढळून आला आहे. बुधवारी पुण्यात दोघा कोरोनाबधित रुग्णांना घरी सोडण्यात आले. तत्पूर्वी मुंबई आणि औरंगाबाद येथील रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे.

15-patients-of-corona-discharge-says-rajesh-tope
15-patients-of-corona-discharge-says-rajesh-tope

मुंबई- राज्यातील आरोग्य यंत्रणा ज्या पद्धतीने काम करीत आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत. आतापर्यंत 15 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मुंबईत दिली. दरम्यान, राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 124 झाली आहे. आज नव्याने मुंबईत 1 आणि ठाणे येथे 1 रुग्ण आढळून आला आहे. बुधवारी पुण्यात दोघा कोरोनाबधित रुग्णांना घरी सोडण्यात आले. तत्पूर्वी मुंबई आणि औरंगाबाद येथील रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे.

हेही वाचा-कर्तव्यनिष्ठा; गुन्हे शाखेच्या महिलांकडून बंदोबस्तावरील पोलिसांना पाणी, बिस्कीट वाटप

दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज दुसरा दिवस आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details