महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज.. आत्ता... शनिवारी रात्री 12 वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर...

अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला महुर्त सापडला, ' या' १३ जणांचा उद्या होणार शपथविधी. भररस्त्यात पेट्रोल ओतून तरुणाला जिवंत जाळले; परभणीच्या सेलू तालुक्यातील घटना. चंद्रपूरमध्ये दहशत माजविणारा बिबट्या अखेर जेरबंद, गडबोरीत दोन जणांचा घेतला होता बळी. अखेर ममता नरमल्या; डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, कामावर रुजू होण्याचे आवाहन. ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर ८७ धावांनी दणदणीत विजय; गुणतलिकेत कांगारु अव्वलस्थानी.

By

Published : Jun 15, 2019, 11:55 PM IST

आज.. आत्ता... शनिवारी रात्री 12 वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर...

अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला महुर्त सापडला, ' या' १३ जणांचा उद्या होणार शपथविधी

मुंबई - राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रलंबीत असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या (रविवारी) होणार आहे. यामध्ये १३ जणांना नव्याने मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. उद्या सकाळी ११ वाजता नवीन मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. वाचा सविस्तर

भररस्त्यात पेट्रोल ओतून तरुणाला जिवंत जाळले; परभणीच्या सेलू तालुक्यातील घटना

परभणी- सेलू तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे आज एका तरुणाच्या अंगावर पेट्रोलची कॅन ओतून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सतीश बरसाले (३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. घरासमोरील नाली काढण्याच्या आणि ओटा तोडल्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादाचे पर्यावसन हत्येत झाले. याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी मात्र फरार झाले आहेत. वाचा सविस्तर

चंद्रपूरमध्ये दहशत माजविणारा बिबट्या अखेर जेरबंद, गडबोरीत दोन जणांचा घेतला होता बळी

चंद्रपूर - सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे दोन जणांचा बळी घेऊन दहशत माजविणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आले. आज रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. बिबट्याला 'डार्ट' मारून बेशुद्ध करण्यात आले. वाचा सविस्तर

अखेर ममता नरमल्या; डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, कामावर रुजू होण्याचे आवाहन

कोलकाता - डॉक्टरांना मारहाणप्रकरणी पश्चिम बंगालमध्ये गेल्या पाच दिवसांपासून संपावर गेलेल्या डॉक्टरांच्या सर्व मागण्या अखेर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मान्य केल्या आहेत. तसेच, पत्रकार परिषद घेत त्यांनी डॉक्टरांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे आवाहनही केले आहे. 'रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना झालेल्या मारहाणीची घटना दुर्देवी असून याप्रकरणी लवकरच तोडगा काढला जाईल,' असे आश्वासन त्यांनी दिले. वाचा सविस्तर

ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर ८७ धावांनी दणदणीत विजय; गुणतलिकेत कांगारु अव्वलस्थानी

लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेतील ऑस्टेलिया विरुध्द श्रीलंका या सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा ८७ धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने गुणतलिकेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय चुकीचा ठरवत ऑस्ट्रेलियाने कर्णधार अरोन फिंचच्या दीडशतकी खेळीच्या बळावर ३३४ धावांचा डोंगर उभा करून श्रीलंकेसमोर कठीण आव्हान ठेवले. चांगल्या सुरूवातीनंतरही श्रीलंकेचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला व श्रीलंकेचा डाव २४७ धावांवर आटोपला. वाचा सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details