महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुखद...! पालिकेचे १५ दवाखाने आता रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहणार

पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत एकूण १८६ दवाखाने कार्यरत आहेत. दवाखान्यांमध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत रुग्णांवर उपचार केले जातात. या माध्यमातून हजारो रुग्ण ही उपचार सेवा घेतात. मात्र, या वेळेदरम्यान बहुतांशी सर्वच शासकीय-खासगी कार्यालयांच्या कामकाजाच्या वेळा असल्याने संबंधित ठिकाणी काम करणार्‍या नोकरवर्गाला पालिकेच्या या आरोग्य सेवेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे पालिकेचे दवाखाने दुपारी ४ ते रात्रो ११ या वेळेत सुरू ठेवावे अशी मागणी केली जात होती.

mumbai mnc
मुंबई महानगरपालिका

By

Published : Dec 3, 2019, 8:08 AM IST

मुंबई - मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात आणि दवाखान्यात स्वस्त आणि चांगले उपचार होत असल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पालिकेचे दवाखाने सायंकाळी बंद असल्याने मोठ्या रुग्णालयांकडे धाव घेतली जात असल्याने मोठ्या रुग्णालयांवरील भार वाढतो. हा भार कमी करता यावा म्हणून पालिकेचे १५ महत्त्वाचे दवाखाने आता दुपारी ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत एकूण १८६ दवाखाने कार्यरत आहेत. दवाखान्यांमध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत रुग्णांवर उपचार केले जातात. या माध्यमातून हजारो रुग्ण येथील उपचार सेवा घेतात. मात्र, या वेळेदरम्यान बहुतांशी सर्वच शासकीय-खासगी कार्यालयांच्या कामकाजाच्या वेळा असल्याने संबंधित ठिकाणी काम करणार्‍या नोकरवर्गाला पालिकेच्या या आरोग्य सेवेचा लाभ घेता येत नाही. शिवाय सायंकाळी दवाखाने बंद असल्याने औषधांकरिता रुग्णांना बराच वेळ दवाखान्यात थांबावे लागते.

हेही वाचा -कांद्याने सामान्यांच्या डोळ्यात आणले पाणी, राज्यात कांद्याचे दराने गाठला उच्चांक

तसेच ठराविक सेवेत हे दवाखाने सुरू असल्यामुळे या वेळेत रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढते. परिणामी केवळ ठराविक वेळेमुळे पालिकेच्या रुग्णसेवेचा लाभ घेऊ शकत नसणार्‍या गोरगरिबांना खासगी रुग्णालयांत महागडे उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे पालिकेचे दवाखाने दुपारी ४ ते रात्रो ११ या वेळेत सुरू ठेवावे अशी मागणी केली जात होती.

हेही वाचा -पैशासाठी विवाहितेसह २ चिमुकल्यांचा खून, पतीसह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

या पार्श्वभूमीवर पालिकेच्या एकूण १८६ पैकी सध्या १५ दवाखाने दुपारी ४ ते रात्रो ११ या वेळेत खासगी पद्धतीने सुरू ठेवण्यात येणार आहेत. दुपारी ४ ते रात्रो ११ या वेळेत खासगी पद्धतीने दवाखाने चालवण्यासाठी मे. रुबी अलकेअर सर्व्हिसेस लि. कंपनीला कंत्राट देण्यात येणार आहे. 2 वर्षांच्या कामाकरिता वैद्यकीय अधिकार्‍यांना प्रतिमहा ६० हजार रुपये तर बहुउद्देशीय कामगारांना प्रतिमहा १७,५०० रुपये मानधन देण्यात येणार आहे. उपरोक्त दवाखान्यांमध्ये दोन वर्षांसाठी १५ वैद्यकीय अधिकारी व १५ बहुउद्देशीय कामगारांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती केली जाणार आहे. 2 वर्षांचा एकूण खर्च 2 कोटी ७९ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.

'हे' दवाखाना आता नागरिकांसाठी खुले राहणार -

  • ए विभाग - कुलाबा म्युनिसिपल दवाखाना
  • बी विभाग - वालपाखाडी दवाखाना
  • डी विभाग - बाने कंपाऊंड दवाखाना
  • ई विभाग - साऊटर स्ट्रीट दवाखाना
  • एफ/नॉर्थ - रावळी कॅम्प, वडाळा दवाखाना
  • जी/साऊथ - बीडीडी चाळ दवाखाना
  • एच/ईस्ट - कलिना दवाखाना
  • एच/वेस्ट - ओल्ड खार दवाखाना
  • के/वेस्ट - एन. जे. वाडिया दवाखाना
  • पी/नॉर्थ - चौक्सी दवाखाना
  • आर सेंट्रल - गोराई म्हाडा दवाखाना
  • एल विभाग - चुनाभट्टी दवाखाना
  • एन विभाग - रमाबाई आंबेडकर दवाखाना
  • एस विभाग कांजूर व्हिलेज दवाखाना

ABOUT THE AUTHOR

...view details