लातूर -पाणीटंचाई टाळून लातूरकरांना कायमस्वरूपी पाणी उपलब्ध व्हावे या दृष्टिकोनातून दोन दिवसीय पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जागतिक पातळीवरील जलतज्ञांकडून मार्गदर्शन करून नागरिकांना जलसंवर्धणचे धडे या पाणी परिषदेत देण्यात येत आहेत. परिषदेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी तसेच मनपा आयुक्त यांनी मार्गदर्शन करून लातूरातील पाण्याची साध्यस्थीती मांडली.
हेही वाचा - हमसे जमाना खुद है... जमाने से हम नहीं' - संजय राऊत
भर पावसाळ्यात लातूरकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. मात्र, परतीच्या पावसाने दिलासा दिला असून जून अखेरपर्यंत पाणीटंचाई जाणवणार नाही असा विश्वास जिल्हा प्रशासनाकडून दिला जात आहे. सध्या तरी पाणीटंचाईचे संकट दुरावलेले असले तरी भविष्यातील संकट टाळण्यासाठी या पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सध्या लातूरला 10 दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. 24 तास पाणीपुरवठा व्हावा या अनुषंगाने उपलब्ध पर्याय काय आहेत त्यासंबंधीचे मार्गदर्शन या पाणी परिषद मध्ये करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये लातुमधील नागरिकांच्या प्रतिक्रिया आणि जलतज्ञांचे मार्गदर्शन यामधून एक योजना ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे लातुरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होणार असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले आहे. शिवाय 24 तास पाणीपुरवठा करणाऱ्या महानगपालिकेच्या अभियंत्याचे मार्गदर्शन या पाणी परिषदेमध्ये लाभणार आहे.