महाराष्ट्र

maharashtra

दिलासादायक..! कोरोना रुग्णांच्या संपर्कातील 142 जणांचे अहवाल निगेटिव्ह

लातूर जिल्ह्यात केवळ उदगीर शहरातच कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत 8 जणांना कोरोनाची लागण झाली असून या सर्वांवर उदगीर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र, या रुग्णांच्या संपर्कात डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कामगार, कर्मचारी याच्यासह इतरांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत.

By

Published : May 3, 2020, 11:42 AM IST

Published : May 3, 2020, 11:42 AM IST

the-reports-of-142-people-in-contact-with-corona-patients-were-negative-in-latur
the-reports-of-142-people-in-contact-with-corona-patients-were-negative-in-latur

लातूर- उदगीर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. अशातच एक दिलासादायक बाब घडली आहे. 8 कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 142 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

हेही वाचा-बोरिस जॉन्सन अन् कॅरी सायमंड्स यांनी आपल्या मुलाचे 'हे' ठेवले नाव

लातूर जिल्ह्यात केवळ उदगीर शहरातच कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत 8 जणांना कोरोनाची लागण झाली असून या सर्वांवर उदगीर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र, या रुग्णांच्या संपर्कात डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कामगार, कर्मचारी याच्यासह इतरांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. तर 4 जणांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे.

एकट्या उदगीर शहरातच 8 रुग्ण आढळून आल्याने 13 मे पर्यंत शहरात संचारबंदी करण्यात आली आहे. 3 मे नंतर इतरत्र प्रवास करता येणार असला तरी उदगीर शहर कडकडीत बंद असल्याने येथून ना प्रवास करता येणार आहे ना कुणाला शहरात येता येणार आहे. 8 दिवसांपूर्वी कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा सज्ज करण्यात आली असून अत्यावश्यक सेवा देखील घरपोच दिली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details