लातूर -विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांविषयीची भीती किती असते, याचा प्रत्यय देवणी तालुक्यातील धनेगाव शाळेत आला आहे. मुलांमध्ये खेळताना झालेले भांडण आणि त्यात मुलाने 'तुझे नाव शिक्षकांना सांगतो' म्हणून दाखवलेल्या भीती, यामुळे घाबरलेल्या १४ वर्षीय रोहित संतोष शृंगारे या विद्यार्थ्याने चक्क शाळेच्या दुसऱ्या माजल्यावरून खाली उडी मारली. खाली पडल्यानंतर रोहित जखमी झाला असून त्याच्यावर लातूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लातूरमध्ये विद्यार्थ्याने शाळेच्या इमारतीच्या दुसर्या मजल्यावरून उडी मारली हेही वाचा... शेअर बाजाराने मोडले सर्व विक्रम; उसळी घेत ४१,८०० अंश निर्देशांकार झेप
रोजच्या प्रमाणे धनेगाव येथील महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत, शाळा भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांचा गोंगाट सुरू होता. रोहितही मित्रांसमवेत शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर खेळत होता. मात्र, खेळताना त्याचे मित्रांसोबत 'तु तु मै मै' झाले. त्यामुळे एका मित्राने 'आता तुझे नाव सरांनाच सांगतो' म्हणत त्याला भीती दाखवली.
हेही वाचा... #CAA Protest LIVE : दिल्ली महिला काँग्रेस अध्यक्षा शर्मिष्ठा मुखर्जी यांना अटक
मित्राच्या धमकीमुळे घाबरलेल्या रोहित शृंगारे याने, शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. शाळेची प्रार्थना सुरू होत असताना काही विद्यार्थ्यांनी रोहित इमारतीवरून पडला असल्याचे शिक्षकांना सांगितले. त्यानंतर शिक्षकांनी त्याच्यावर वलांडी येथे प्राथमिक उपचार केले. नंतर त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रोहित हा मूळचा नळेगाव येथील असून शिक्षणासाठी तो धनेगाव येथील वसतिगृहात राहत आहे. त्याच्या दोन्ही पायाला आणि हनुवटीला मार लागला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. लहान मुलांमधील खेळ कसे जीवावर बेतू शकतात याचा प्रत्यय या घटनेवरून आला आहे.
हेही वाचा... नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात राज्यभर निदर्शने, सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षांचा सहभाग