महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकऱ्यांच्या आत्महत्येला राज्य सरकारच जबाबदार - अमित देशमुख

मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती कायम आहे. यातच राज्य सरकाकरकडून शेतकऱ्यांबद्दल घोषणांचा पाऊस होतो. परंतु, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही, अशी टीका अमित देशमुख यांनी केली

अमित देशमुख

By

Published : Aug 1, 2019, 10:29 AM IST

लातूर- राज्यसरकारने ५ वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना दिलेल्या अश्वासनांची पूर्तता अद्यापही केली नाही. संपूर्ण कर्जमाफीची घोषणाही हवेतच विरली असून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने आत्महत्येचे सत्र सुरु आहे. सरकारच्या या उदासीनतेचेच शिवाजी पवार हे बळी ठरले आहेत. तालुक्यातील रायवाडी येथील शेतकरी शिवाजी पवार यांनी ८ दिवसांपूर्वी नापिकी आणि कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्या पार्श्वभूमीवर अमित देशमुख यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

शेतकऱ्यांच्या आत्महत्येला राज्य सरकारच जबाबदार - अमित देशमुख

मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती कायम आहे. यातच राज्य सरकाकरकडून शेतकऱ्यांबद्दल घोषणांचा पाऊस होतो. परंतु, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. यामुळेच आत्महत्येचे सत्र सुरु आहे. खरिपाच्या पेरणीसाठी जनावरे विकून बी- बियाणे आणणाऱ्या शिवाजी पवार या शेतकऱ्याने पाऊस नाही म्हणून तर पेरणी करायची कशी आणि कर्ज फेडायचे कसे? या विवंचनेतून आत्महत्या केली. याच गावच्या शेतमजुरांनी कामाच्या शोधात स्थलांतर केले आहे.

संपूर्ण कर्जमाफीची अंमलबाजवणी स्थानिक पातळीवर झाली नसल्यानेच शेतकऱ्यांवर आत्महत्येची नामुष्की ओढवत असल्याचा आरोप आमदार अमित देशमुख यांनी केला. शिवाय त्वरित पंचनाम्याची पूर्तता करून पवार कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याबाबत तहसीलदार यांना सूचनाही त्यांनी केल्या आहेत. सध्या भाजप सरकार पक्ष मजबुतीमध्ये व्यग्र आहे. त्यामुळे त्यांना दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्येचा विसर पडला आहे. मात्र, जनता त्यांना जागा दाखवेल, असेही त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details