लातूर - देशभरात लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. लातूर जिल्ह्यातही नागरिक उत्साहाने मतदान करत आहेत. या लोकशाहीच्या उत्सवात भातखेडा गावातील मतदान केंद्र चर्चेचा विषय ठरत आहे. येथील मतदान केंद्रास सखी बूथ असे नाव देण्यात आले असून मतदारांचे स्वागत सनई, चौघड्य़ाच्या निनादात करण्यात येत आहे.
लातुर : भातखेड्यामध्ये सनई चौघड्याच्या निनादात मतदारांचे स्वागत
भातखेड्यातील मतदान केंद्राला एखाद्या लग्न समारंभासारखे सजवले आहे. दिव्यांग मतदारासाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे.
लातुर : सनई चौघड्याच्या निनादात मतदारांचे स्वागत
या मतदान केंद्राला एखाद्या लग्न समारंभासारखे सजवले आहे. दिव्यांग मतदारासाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान करण्यासाठी येत असलेल्या मतदारांना सनई, चौघडा व तुतारी या वाद्यांच्या गजर करतकेंद्राच्या दारापर्यंत आणुन सोडले जात आहे.