महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रब्बी हंगाम तोंडावर, तरी गतवर्षीच्या उत्पादनाचे पैसे नाफेडकडे थकीतच

एकीकडे नाफेडवर शेतकऱ्यांची गर्दी व्हायची. त्यामुळे, जिल्ह्यात प्रड्युसर कंपन्यांची उभारणी करण्यात आली होती. या ठिकाणी शेतीमालाची खरेदीही झाली. परंतु, कंपन्यांनी शेतकऱ्यांचे पैसे अडवून ठेवले आहेत. अशीच परस्थिती राहिली तर यंदा प्रड्युसर कंपन्यांकडे शेतकरी शेतीमाल घेऊन जाईल की नाही, हे सांगता येत नाही.

नाफेड
नाफेड

By

Published : Oct 5, 2020, 5:00 PM IST

लातूर- नैसर्गिक संकटाच्या चक्रव्युहात शेतकरी अडकला असतानाच सुलतानी संकटाचाही त्याला सामना करावा लागत आहे. रब्बीतील हरभऱ्याची खरेदी तर हमीभावाने झाली. मात्र, जून नंतरच्या खरेदी झालेल्या हरभऱ्याचे पैसे अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले नाहीत.

माहिती देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल

लातूर जिल्ह्यात २० ते २२ फार्मिंग प्रोड्युसर कंपन्या नाफेडसाठी शेतकऱ्यांकडून शेतीमाल खेरदी करतात. गतवर्षी याच कंपन्यांकडे शेतकऱ्यांनी रब्बीतील हरभरा विक्री केला. जूनपर्यंत खरेदी केलेल्या शेतीमालाचे पैसे देण्यात आले. मात्र, त्यानंतर खरेदी केलेल्या शेतीमालाचे पैसे आद्यपही शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले नाहीत. विक्री केलेल्या मालाचा मोबदला घेण्यासाठी शेतकरी कंपन्यांकडे खेटे मारत आहेत. परंतु, खरेदी केलेला शेतीमाल नाफेडकडे वर्ग करणे एवढीच जबाबदारी या कंपन्यांची असल्याचे सांगितले जात आहे.

एकीकडे नाफेडवर शेतकऱ्यांची गर्दी व्हायची. त्यामुळे, जिल्ह्यात प्रोड्युसर कंपन्यांची उभारणी करण्यात आली होती. या ठिकाणी शेतीमालाची खरेदीही झाली. परंतु, कंपन्यानी शेतकऱ्यांचे पैसे अडवून ठेवले आहेत. अशीच परस्थिती राहिली तर यंदा प्रड्युसर कंपन्यांकडे शेतकरी शेतीमाल घेऊन जाईल की नाही, हे सांगता येत नाही. त्यामुळे, नाफेडने शेतकऱ्यांचे पैसे त्वरित अदा कारावे. नाही तर आंदोलन छेडले जाणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल यांनी सांगितले.

हेही वाचा-पूर्ववैमनस्यातून गर्भवती महिलेस चौघांनी केली मारहाण; आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश

ABOUT THE AUTHOR

...view details