महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 3, 2019, 5:25 PM IST

ETV Bharat / state

लातुरात कार झाडावर आदळली.. मित्राच्या लग्नासाठी आलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू

बालाजी हा देवणी तालुक्यातील वलांंडीला मित्राच्या लग्नासाठी गावाकडे आला होता. लग्न लागल्यानंतर मित्राला भेट वस्तू घेण्यासाठी तो वलांडीला आला. तेथून तो बहिणीला भेटण्यासाठी जात असता जवळगा साकोळ दरम्यान त्याची कार एका झाडावर आदळली.

one-dead-in-car-accident-in-latur
लातुरात कार झाडाला आदळून तरूणाचा जागीच मृत्यू

लातूर- मित्राच्या लग्नासाठी पुण्याहून गावाकडे आलेल्या तरूणाचा काल (सोमवारी) अपघात झाला. यात तरूणाची कार झाडावर जोराने आदळ्याने तरूणाचा जागीच मृत्यू झाला. बालाजी दिंगबर भोसले (वय २५ रा. बोंबळी) असे तरूणाचे नाव आहे.

हेही वाचा-एक वर्षाच्या चिमुकल्याचा पाण्याच्या टबमध्ये बुडून मृत्यू

बालाजी हा देवणी तालुक्यातील वलांंडीला मित्राच्या लग्नासाठी गावाकडे आला होता. लग्न लागल्यानंतर मित्राला भेट वस्तू घेण्यासाठी तो वलांडीला आला. तेथून तो बहिणीला भेटण्यासाठी जात असता जवळगा साकोळ दरम्यान त्याची कार (एम.एच १२ केडब्ल्यू ५५८५) एका झाडावर जावून आदळली. यात तो जागीच ठार झाला. मृत बालाजी भोसले यांच्या मागे आई-वडील, भाऊ, तीन बहिणी, असा परिवार आहे. या घटनेमुळे बोंबळी गावात हळहळ व्यक्त केली जात असून या दुःखद घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details