महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातूरात 'ती' च्या सन्मानार्थ पुरुषांची रॅली

जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी सकाळपासून विविध उपक्रम राबविले जात आहेत. लातूरमध्ये मात्र पुरुषांनी महिलांच्या सन्मानार्थ रॅली काढली. जिल्हा स्टेडियम ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क अशी रॅली काढण्यात आली.

latur
लातूरात 'ती' च्या सन्मानार्थ पुरुषांची रॅली

By

Published : Mar 8, 2020, 2:39 PM IST

लातूर -जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सर्वत्र महिलांचा सन्मान केला जात आहे. लातुरात मात्र, अनोखा उपक्रम राबविण्यात आला. येथे पुरुषांनीच महिलांच्या सन्मानार्थ रॅली काढली. महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी ही पुरुषांचीहीआहे. त्यामुळे त्यांच्या सन्मानाच्या दृष्टीने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

लातूरात 'ती' च्या सन्मानार्थ पुरुषांची रॅली

जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी सकाळपासून विविध उपक्रम राबविले जात आहेत. लातूरमध्ये मात्र पुरुषांनी महिलांच्या सन्मानार्थ रॅली काढली. जिल्हा स्टेडियम ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क अशी रॅली काढण्यात आली. दरम्यान महिला हा समाजातील महत्त्वाचा घटक असून त्यांचा योग्य सन्मान होणे गरजेचे आहे. म्हणूनच पुरुषांनी महिला सुरक्षेचे आणि त्यांच्या हक्काचे फलक हाती घेऊन रॅली काढली. यामध्ये पुरुषांबरोबर महिलांचाही सहभाग होता.

हेही वाचा -महिला दिन विशेष : बालविवाह ते महिला संघटनेचे नेतृत्व, अशी आहे 'ति'च्या खडतर प्रवासाची कहाणी

महिला- पुरुषांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला आज प्रगती करत आहेत. मात्र, त्यांचा सन्मान होणे गरजेचे असल्याचे मत महिलांनी व्यक्त केले. त्यामुळे जगभर जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असला तरी लातूरमध्ये मात्र पुरुषांनीच महिलांच्या सन्मानार्थ रॅली काढून जागतिक महिला दिनाची सुरुवात केली आहे. यावेळी आमदार अभिमन्यू पवार, नगरसेवक शैलेश गोजमगुंडे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष रघुनाथ मगे यांची उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details