लातूर - शहरातील गुळमार्केट येथील भाजीबाजार वगळता सर्व ठिकाणच्या भाजीमंडई बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या ठिकाणीही गर्दी होत असल्याने अखेर गुरुवारपासून येथील भाजीमंडई बंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला.
लातूरचे भाजीबाजार अखेर बंद, नागरिकांच्या गर्दीमुळे निर्णय
अत्यावश्यक सेवा म्हणून येथील भाजीमंडई सुरू ठेवण्यात आली होती. येथील गर्दी प्रशासन, पोलीस तसेच बाजार समितीसाठी डोकेदुःखी ठरत होती. सांगूनही ऐकले जात नसल्याने अखेर हे भाजीबाजार बंद करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी पहिल्यांदाच या बाजारात शुकशुकाट पाहायला मिळाला.
अत्यावश्यक सेवा म्हणून येथील भाजीमंडई सुरू ठेवण्यात आली होती. येथील गर्दी प्रशासन, पोलीस तसेच बाजार समितीसाठी डोकेदुःखी ठरत होती. सांगूनही ऐकले जात नसल्याने अखेर हे भाजीबाजार बंद करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी पहिल्यांदाच या बाजारात शुकशुकाट पाहायला मिळाला. शेकडो शेतकरी आपला भाजीपाला पहाटेपासून घेऊन येतात. ते खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्याही मोठी आहे. तसेच शहरात गाड्यावर भाजीपाला विक्री करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. हे सर्वजण येथूनच भाजीपाला खरेदी करतात. इतकेच नव्हे तर येथे भाजीपाल्याचे दर कमी राहत असल्याने शहरातील रहिवासी भाजीपाला खरेदीसाठी या बाजारात रोज येतात. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, नागरिकांना आता शेतकऱ्यांकडून भाजीपाला विकत घेतल्याशिवाय पर्याय उरलेला नाही.