लातूर : राज्याचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी (Protest Against Koshyari Trivedi) यांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्यांमुळे देशभरातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली (contraversial statment about shivaji maharaj) आहे. या दोघांच्या विरोधात ठिकठिकाणी निदर्शने केली जात आहे. या दोघांचा निषेध करण्यासाठी आज लातूरकरांनी बंदची (Latur bandh) हाक दिली आहे.
Protest Against Koshyari Trivedi : कोश्यारी-त्रिवेदींच्या निषेधार्थ आज लातूर बंद ; शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट
राज्याचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी (Protest Against Koshyari Trivedi) यांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्यांमुळे देशभरातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली (contraversial statment about shivaji maharaj)आहे. या दोघांचा निषेध करण्यासाठी आज लातूरकरांनी बंदची (Latur bandh) हाक दिली आहे.
लातूर बंद :लातूरमधील शिवप्रेमींची शासकीय विश्रामगृहात तातडीची बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत शुक्रवारी लातूर बंदची हाक देण्यात आली. हा बंद शंभर टक्के यशस्वी व्हावा. त्यात सर्वांचा सहभाग असावा यासाठी बैठकीत व्यापक चर्चा करण्यात आली. व्यापारी संघटना, शाळा महाविद्यालये, विद्यार्थी वाहतुक संघटना, ऑटोरिक्षा युनियन, आडत व्यापारी संघटना, फ्रुट मार्केट असोसिएशन, भाजीपाला मार्केट असोसिएशन, शिकवणी वर्ग यांना या बंदबाबत पत्रके देण्यात येणार आहेत. शुक्रवारी व्यवहार, प्रतिष्ठाने, शाळा, महाविद्यालये बंद ठेवावीत अशी विनंती करण्यात आली आहे. शिवाय बंदच्या दिवशी शेतकऱ्यांनी भाजीपाला, धान्य लातूरच्या बाजारात विक्रीस आणू नये अशी विनंतीही करण्यात आली (Governor Bhagat Singh Koshyari) आहे.
महापुरुषांबद्दल अवमानकारक विधाने :छत्रपती शिवाजी महाराज हे विश्ववंद्य असून त्यांच्या कार्य व शौर्याची थोरवी जगाने गायली. यापूर्वीही कोश्यारींनी महापुरुषांबद्दल अवमानकारक विधाने केली आहेत. महापुरुषांचा अवमान करणाऱ्या व्यक्तीला राज्याच्या राज्यपालपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. जनतेची ही भावना लक्षात घेवून मोदी सरकारने कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरुन हटवावे. यासाठी जिल्ह्यातील खासदार व आमदारांना शिवप्रेमींच्या वतीने निवेदन देण्याचेही या बैठकीत ठरले आहे. येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी केंद्रसरकारने याबाबत निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा व कोणत्याही मंत्र्याना महाराष्ट्रात फिरू न देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे सांगितले (BJP spokesperson Sudhanshu Trivedi) आहे.