महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातुरात पाच वर्षांपासून गरजवंताना कपडा बँकेची 'मायेची उब'

. सार्वजनिक ठिकाणी आडोसा शोधून रात्र काढणाऱ्या नागरिकांना ब्लॅंकेटचे वाटप केले जात आहे.

कापड बँक
कापड बँक

By

Published : Dec 31, 2020, 10:00 PM IST

Updated : Dec 31, 2020, 11:01 PM IST

लातूर - चालू वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. पण लातूरमधील कपडा बँकेच्या वतीने गरजू, निराधार अशा नागरिकांचा शोध घेऊन थंडीपासून बचाव व्हावा या दृष्टीकोनाकातून मायेची ऊब दिली जात आहे. गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.

ज्यांच्याकडे चांगल्या स्थितीतील कपडे आहे, त्यांच्याकडील कपडे गरजुपर्यंत पोहोचविले जातात. एवढ्या साध्या पद्धतीने या कपडा बँकेचे व्यवहार वर्षभर होतात. वर्षाच्या अखेर दिवशी जे नागरिक थंडीत आडोसा घेऊन झोपलेले असतात, अशा नागरिकांना ब्लॅंकेट वाटपाचे काम या बँकेच्या वतीने केले जाते. गेल्या चार वर्षांपासून या उपक्रमामध्ये खंड पडलेला नाही.

गरजवंताना कपडा बँकेची 'मायेची उब'
चार वर्षात 7 लाखांहून अधिक कपड्यांची उलाढालकल्पतरू बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून शहरातील डॉक्टर्स, वकील तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांनी एकत्र येत ही कपडा बँकेची संकल्पना समोर आणली आहे. यापूर्वी 'माणुसकीची भिंत' च्या माध्यमातून कपड्याची देवाण-घेवाण सुरू होती. पण या ठिकाणी कुणाचे नियंत्रण नसल्याने ही संकल्पना काळाच्या ओघात मागे पडली. मात्र, कल्पतरू बहुउद्देशीय संस्थेने 20 डिसेंबर 2016 रोजी कपडा बँकेची स्थापना केली. एवढेच नव्हे तर या माध्यमातून वेगवेगळे उपक्रमही सुरू ठेवले. बुधवार वगळता नियमित ही 11 ते 7 दरम्यान कपडा बँकेचे काम सुरू असते. या माध्यमातून गेल्या चार वर्षात 7 लाखांहून अधिक कपड्यांची उलाढाल झाली आहे. एवढेच नाही तर थंडीत निराधार तसेच गरजवंताची गैरसोय होऊ नये म्हणून 31 डिसेंबर रोजी ब्लॅंकेटचे वाटप केले जात. दरवर्षी शहरातील जवळपास 300 हून गरजवंताना अशा प्रकारे मायेची ऊब दिली जात आहे. सामाजिक उत्तरदायित्व म्हणून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला आता चार वर्षे उलटली आहेत. मात्र, बँकेच्या सदस्य तसेच समाजातील विविध घटकातील नागरिकांच्या मदतीने हा उपक्रम सुरू आहे. योग्य नियोजन आणि देवाण- घेवाणच्या नोंदीबँकेप्रमाणेच येथील कपडा बँकेचे व्यवहार असतात. फरक एवढाच की येथे पैशाचे व्यवहार होत नाहीत. तर कपड्यांचे देवाण- घेवाण होते. असे असले तरी सकाळी 11 ते सायंकाळी 7 पर्यंत ही बँक सुरू असते. कपडे दान करणाऱ्यांचे तसेच घेऊन जाणाऱ्यांच्या नोंदीही या ठिकाणी केल्या जातात. दिवसाकाठी 5 ते 6 जण कपडे दान करतात. तर 8 ते 10 जणांना याचा लाभ होत असल्याचे डॉ. संतोषकुमार डोपे यांनी सांगितले आहे. कपडा बँकेने घेतली माणुसकीच्या भिंतीची जागा लातूर शहरात 6 वर्षांपूर्वी माणुसकीची भिंत या ठिकाणाहून कपड्यांची देवाण घेवाण झाली होती. पण नियोजनाचा अभाव आणि कपडे घेऊन जाताना अनेकांना संकोचीत भावना निर्माण होत असे. याच गोष्टीचे भान राखत या कपडा बँकेची स्थापना केली होती.
Last Updated : Dec 31, 2020, 11:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details