महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातूरमध्ये उपोषणकर्त्या शिक्षकांची प्रकृती खालावली; प्रशासनाकडून आश्वसनाची बोळवण

योगवाशिष्ठ शिक्षण प्रसारक मंडळांतर्गत असलेल्या तीनही विद्यालयात संस्थाचालकाचा मनमानी कारभार सुरू आहे. त्यामुळे त्रस्त शिक्षकांनी लातूरमधील जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, काही शिक्षकांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर उर्वरित शिक्षक मागण्यांवर ठाम आहेत.

By

Published : Jun 13, 2019, 1:32 PM IST

लातूरमध्ये उपोषणकर्त्या शिक्षकांची प्रकृती खालावली

लातूर - योगवाशिष्ठ शिक्षण प्रसारक मंडळांतर्गत असलेल्या तीनही विद्यालयात संस्थाचालकाचा मनमानी कारभार सुरू आहे. त्यामुळे त्रस्त शिक्षकांनी लातूरमधील जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, काही शिक्षकांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर उर्वरित शिक्षक मागण्यांवर ठाम आहेत.

लातूरमध्ये उपोषणकर्त्या शिक्षकांची प्रकृती खालावली

योगवाशिष्ठ शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळांमध्ये संस्था सचिव रामदास पवार यांचा मनमानी कारभार होत असून अधिकतर पदावर नातेवाईकांचा समावेश करण्यात आला आहे. तर शाळेच्या इमारतीसाठी शिक्षकांकडून घेतलेले पैसे परत करावेत, रंगकामासाठी प्रत्येक शिक्षकाकडून घेतलेले २८ हजार रुपये परत करावेत, शिवाय महिला शिक्षकांना आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल संस्था सचिव व त्यांचा मुलगा किरण पवार यांच्यावर गुन्हा दाखल करावा, नियमित पगार देण्यात यावा या मागणीसाठी मुख्याध्यापकांसह ९ सहशिक्षकांनी उपोषण सुरू केले आहे.

याच बरोबर आर्थिक शोषण करून मानसिक त्रास देणे, जाणीवपूर्वक अनुपस्थिती दर्शविणे अशा त्रासाला या मंडळातील कर्मचारी त्रासले आहेत. यापूर्वीही काही शिक्षकांनी या संस्थाचालकाविरोधात तक्रारही नोंद केली. मात्र, कारवाई न झाल्याने पुन्हा या कर्मचाऱ्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. आता कारवाई झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे शिक्षकांनी सांगितले. दरम्यान, बुधवारी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी काही महिला शिक्षकांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे तीन शिक्षकांना उपचारासाठी सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details