दुष्काळप्रश्नी औसा शहरात महिन्यात दोनदा बंद; ७ दिवसांपासून छावा संघटनेचे आमरण उपोषण
लातुरात पाणीप्रश्न भीषण झाला असून मागील ७ दिवसांपासून शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. तसेच दुष्काळप्रश्नी औसा शहरात महिन्यात दोनदा बंद पाळण्यात आला आहे. तरीदेखील प्रशासनाकडून या संदर्भात कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही.
आमरण उपोषण
लातूर - भर पावसाळ्यात लातूरकर दुष्काळी झळांचा सामना करीत आहेत. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील औसेकरांनी पाणीप्रश्नाला घेऊन शहर बंद ठेवले होते. तर आज गुरुवारी शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन छावा संघटनेच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देत बंदची हाक देण्यात आली आहे.
भर पावसाळ्यात औसेकरांनी पाणी विकत घ्यावे लागत आहे. दरम्यान, माकणी धारणावरून नियोजित असलेली पाईपलाईन अनेक वर्षापासून रखडलेली आहे. त्यामुळे पाणीप्रश्न पेटला असून नागरिक त्रस्त आहेत.दुष्काळी प्रश्नांबाबत आतापर्यंत शहर दोन वेळेस बंद ठेवण्यात आले असून प्रशासनाकडून या संदर्भात कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.