महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महानुभाव पंथाच्या चातुर्मासात आलेले साधक पडले होते अडकून. . .अखेर त्यांचा आश्रमात परतण्याचा मार्ग 'असा' झाला मोकळा

कोरोना संसर्गामुळे संचारबंदी व जमावबंदी लागू झाल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. तरी गावाच्या बाहेर मारण्यात आलेल्या प्रांगणात कार्यक्रम ठरला होता. चार दिवसापूर्वी तालुक्यात झालेल्या वादळी वारे व अवकाळी पावसामुळे मंडप उडून गेल्याने त्यांची गैरसोय झाली होती.

Corona Virus
संचारबंदीत अडकलेले साधक

By

Published : Apr 18, 2020, 8:30 PM IST

लातूर- महानुभाव पंथाच्या चातुर्मास कार्यक्रमास आलेले 1 हजार 341 साधक संचारबंदीमुळे निलंगा तालुक्यातील राठोडा येथील अडकून पडले होते. या साधकांना त्यांच्या मूळ आश्रमात जाण्याचा मार्ग मंत्रालयातून मोकळा झाला आहे. त्यांना शासनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून मूळ गावी सोडण्याचा आदेश मंत्रालयातून आल्यानंतर आज ते त्यांच्या जाधववाडी गावाकडे रवाना झाले आहेत.

महानुभाव पंथाच्या चातुर्मासा आलेले साधक पडले होते अडकून. . .अखेर त्यांचा आश्रमात परतण्याचा मार्ग 'असा' झाला मोकळा

याबाबतची माहिती अशी, की जाधववाडी येथील जवळपास दीड हजार साधक राठोडा येथे फेब्रुवारी महिन्यात चार्तुमास कार्यक्रमास आले होते. मात्र कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू झालेल्या संचारबंदीमुळे हे सर्व नागरिक गावातच अडकून पडले होते. राठोडा या गावात महानुभाव पंथाचे दरवर्षी कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदा चातुर्मासाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील काही साधक मोठ्या प्रमाणात आले होते.

25 फेब्रुवारीपासून 29 मार्चपर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कोरोना संसर्गामुळे संचारबंदी व जमावबंदी लागू झाल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. तरी गावाच्या बाहेर मारण्यात आलेल्या प्रांगणात कार्यक्रम ठरला होता. संपूर्ण जगामध्ये कोरोना संसर्गाने थैमान घातले असून भारतात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले. त्यामुळे संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या गावात जवळपास दीड हजार साधक अडकून पडले होते. त्यांची व्यवस्था शेतामध्ये स्वतंत्रपणे करण्यात आली. तरी त्यांचा मुळ गावाकडील आश्रमात जाण्याचा मार्ग बंद झाला होता.

या कार्यक्रमासाठी गावकऱ्यांकडून त्यांच्या भोजन अथवा राहण्याची अडचण नसली, तरी मूळ गावच्या आश्रमात जाण्याचा मार्ग बंद झाल्याने ते अस्वस्थ होते. पुणे जिल्ह्यातील जाधववाडी येथे त्यांना त्यांच्या मूळ आश्रमात जायचे होते. त्यामुळे आमच्या मूळगावी जाण्याची विनंती त्यांनी प्रशासनाकडे केली होती. चार दिवसापूर्वी तालुक्यात झालेल्या वादळी वारे व अवकाळी पावसामुळे मंडप उडून गेल्याने त्यांची गैरसोय झाली होती. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात असणारे साधक सोशल डिस्टन्स कसे पाळणार याबाबत समस्या होती. अखेर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी याबाबत मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला.

या साधकांना त्यांच्या मूळगावी असलेल्या आश्रमात सोडण्यात यावे, शासनाने दिलेल्या सर्व सूचनाचे तंतोतंत पालन करावे. शिवाय सोशल डिस्टन्सबरोबर एका गाडीमध्ये पन्नासपेक्षा अधिक प्रवासी ठेवू नये, मास्क, सॕनिटायझर या सर्व बाबी सूचना पाळावे, असे या मंत्रालतून निघालेल्या आदेशात नमूद केले आहे. महसूल व वनविभागाने ही परवानगी शुक्रवारी सचिव किशोर राजेनिंबाळकर यांनी दिले आहे. या साधकांना तब्बल 23 दिवसानंतर त्यांना त्यांच्या मूळ आश्रमात जाण्याची परवानगी मिळाली. अखेर ते आज गाड्यामध्ये रवाना झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details