निलंगा(लातूर) - तालुक्यात पावसाच्या थैमानामुळे शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पीक वाहून गेले आहे. सोबतच रास केलेले सोयाबीनदेखील पाण्याने सडले आहे. सोनखेडच्या शेतकऱ्यांचे या अतिवृष्टीने हाल झाले असून ते पुरते हतबल झाले आहेत.
अतिवृष्टीचा फटका; पिके गेली वाहून... तर, जमिनीही खरडल्या
सोनखेड आणि परिसराती काही गावातील शेतकऱ्यांच्या नदीकाठावर असलेल्या जमिनी पूर्णपणे वाहून गेल्या आहेत. सगळीकडे फक्त साचलेले पाणी दिसत आहे. सरकार आणि प्रशासनाने पंचनामे करण्याची वाट न पाहता सरसकट मदत करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
निलंगा तालुक्यात गेल्या चार दिवसापासून पावसाने थैमान घातले आहे. सोनखेड बोरसुरी गावच्या मध्यभागी तेरणा नदीवर कोल्हापुरी बंधारा आहे. या बंधाऱ्याभोवताली असलेल्या जमिनीवरील पिके पाण्यात वाहून गेली. पावसाचा जोर जास्त असल्याने जमीनही खरडली गेली आहे. सोनखेड आणि परिसराती काही गावातील शेतकऱ्यांच्या नदीकाठावर असलेल्या जमिनी पूर्णपणे वाहून गेल्या आहेत. सगळीकडे फक्त साचलेले पाणी दिसत आहे. सरकार आणि प्रशासनाने पंचनामे करण्याची वाट न पाहता सरसकट मदत करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. निलंग्यात आमदार, तसेच खासदारांचे पीक पाहणी दौरे झाले आहेत. मात्र, मदत मिळालेली नाही.
गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा राज्यातील अनेक जिल्ह्यांना फटका बसला. पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, उस्मानाबाद, नांदेडसह लातूर जिल्ह्यात खरीप हंगामाचे पिक पूर्णपणे नष्ट झाले आहे. लाखो हेक्टरवरील पिके पाण्यात खराब झाली असून काही ठिकाणी पिके पुर्णपणे वाहून गेली आहेत. मंत्र्यांच्या अतिवृष्टीग्रस्त भागातील दौऱ्यांना सुरुवात झाली आहे. शेतकरी मात्र, मदतीच्या प्रतिक्षेत आहे.